1 / 9भारतामध्ये भाजी तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामधील एक पद्धत म्हणजे भाजीमध्ये सारण भरून केलेली भरली भाजी.2 / 9 भाज्यांमध्ये विविध प्रकारचे सारण भरून त्या भरलेल्या भाज्या शिजवल्या जातात. त्या सारणामध्ये नारळ, खोबरं, अनेक मसाले यांचा वापर केलेला असतो. चवीला हा प्रकार फारच छान असतो.3 / 9महाराष्ट्रामध्ये काही ठराविक भाज्यांचा वापर करून भरली भाजी तयार केली जाते. यामध्ये या काही भाज्यांचा समावेश आहे.4 / 9१. सर्वांनाच माहिती असेल अशी एक भाजी म्हणजे भरलं वांग. वांग्यामध्ये नारळाचा मसाला भरून वांगं शिजवलं जातं. भरलं वांग अत्यंत लोकप्रिय असा पदार्थ आहे.5 / 9२. तोंडली आकाराला जरी लहान असली, तरी तोंडलीला चिर देऊन नंतर त्यामध्ये सारण भरायचे. यासाठी दाण्याचे कुट वापरता येते. नारळ वापरता येतो.6 / 9३. भरलेली सिमला मिरची समारंभांमध्ये पाहायला मिळते. ती तयार करायलाही फार सोपी आहे. सारण तयार करताना भरपूर मसाले वापरून तयार करा. खरी मज्जा त्या सारणामध्येच असते.7 / 9४. बाजारात अनेक प्रकारच्या मिरच्या मिळतात. त्यामध्येच एक जाड व पोपटी रंगाची मिरचीही मिळते. त्याच मिरचीचा वापर करून भरली मिरची तयार करता येते.8 / 9५. ढेमसे अनेकांना माहितीच नसते. पण ढेमस्याची भाजी फार पौष्टिक असते. ढेमस्यामध्ये विविध प्रकारचे मसाले भरून नंतर ते तेलावर परतले जाते.9 / 9६. भरलेली भेंडी चवीला प्रचंड सुंदर लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ताव मारत खातात.