नवरात्रीमध्ये साडी नेसल्यावर गळ्यात हवंच ठसठशीत लांब मंगळसूत्र! बघा ९ लेटेस्ट सुंदर डिझाईन्स...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2025 15:58 IST2025-09-14T15:52:48+5:302025-09-14T15:58:23+5:30

एरवी कित्येक जणी गळ्यात छोटं मंगळसूत्र घालतात. पण नवरात्र, दसरा अशा सणांच्या निमित्ताने वरचेवर साडी नेसणं होतं. आता साडी नेसली म्हटल्यावर गळ्यातही छान ठसठशीत दिसणारं मंगळसूत्र हवंच. त्यासाठीच बघा हे काही लेटेस्ट पॅटर्न्स...
हल्ली सोन्याच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे खरं मंगळसूत्र घालण्याची भीतीच वाटते. म्हणूनच अशा मंगळसुत्रांचे काही प्रकार नेहमी घालायला आपल्याकडे हवेतच.
असं मोठ्या वाट्या असणारं मंगळसूत्र काठपदराच्या साड्यांवर नेहमीच शोभून दिसतं.
या मंगळसुत्राला ठुशी मंगळसूत्र म्हणतात. सध्या या प्रकारातही कित्येक वेगवेगळे डिझाईन्स मिळत आहेत.
थोडं वेगळ्या पद्धतीचं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर हे ढोलक मणी मंगळसूत्रही घेऊ शकता.
हा एक सुंदर वेगळा प्रकार पाहा. हल्लीच्या तरुण मुलींना अशा प्रकारचे मंगळसूत्र विशेष आवडतात.
अशा प्रकारचे कित्येक मंगळसूत्र तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.
तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमध्येही अशा मंगळसुत्रांचे बरेच वेगवेगळे डिझाईन्स मिळू शकतात.
असा ठसठशीत दिसणारा दागिना गळ्यात असल्यावर इतर कोणत्याच दागिन्याची गरज नाही.