ब्लाऊजच्या स्लिव्हजच्या १० ट्रेंडी डिजाईन्स; नवीन पॅटर्न उठून दिसेल-साडीत बारीक, सुंदर दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:41 IST2025-09-12T13:19:46+5:302025-09-12T13:41:21+5:30

Latest Blouse Sleeves Designs : ब्लाऊजमध्ये चुण्या आणि बटन्स असे पॅटर्न तुम्ही निवडू शकता.

साडी कोणतीही असो तुम्ही ब्लाऊज कोणतं निवडता,ब्लाऊजचा गळा,बाह्या कशा आहेत हे फार महत्वाचं असतं. ब्लाऊजच्या बाह्या जितक्या सुंदर, नवीन पॅटर्नच्या शिवाल तितकाच लूक खुलून येतो.(Latest Sleeve designs)

ब्लाऊज डिजाईन्सचे काही नवीन स्लिव्हज पॅटर्न पाहूया. कॉटन साडी, ऑर्गेंजा,काठपदराची सिल्क साडी प्रत्येक साडीवर या ब्लाऊज डिजाईन्स उठून दिसतील. (Which Sleeve trending Now)

ब्लाऊजमध्ये चुण्या आणि बटन्स असे पॅटर्न तुम्ही निवडू शकता. साडीच्या काठाच्या रंगाचे बटन्स ब्लाऊजच्या मागच्या बाजूला आणि बाह्यांना तुम्ही लावू शकता.(Beautiful Sleeve Designs)

ब्लाऊजच्या खाली तुम्ही डिजाईन्सच्या सुंदर लेस लावून घेऊ शकता. असे ब्लाऊज तुम्हाला लग्नकार्यात किंवा कोणत्याही कार्यक्रमात स्टायलिश लूक देतील. (New Popular Blouse Sleeve Designs)

आजकाल बऱ्याच साड्यांच्या ब्लाऊज पिसमध्ये गळ्याचं पॅटर्न दिलेले असते. त्याप्रमाणेच तुम्हाला शिवावे लागते. जर तुम्हाला त्या पॅटर्नचा गळा आवडत नसेल तर तुम्ही नवीन ब्लाऊज पीस विकत घेऊन त्यानुसार ब्लाऊज शिवू शकता.

जर तुम्हाला खूपच युनिक डिजाईन हवी असेल तर तुम्ही या पद्धतीन डिजाईनचे पॅटर्न शिवू शकता आणि खालच्या बाजूला नॉट्स किंवा गोंडे लावा.

साडीच्या रंगानुसार तुम्ही त्यावर कसे वर्क करायचे ते ठरवू शकता. मोत्यांचे सुंदर नक्षीकाम त्यावर करून घेऊ शकता.

फुग्याच्या बाह्यांची फॅशन पुन्हा आली आहे. प्लेन फुग्याचं ब्लाऊज न शिवता तुम्ही यात हे सुंदर पॅटर्न शिवू शकता.

जर हात बारीक असतील तर तुम्ही असं फुग्याचं शॉर्ट स्लिव्हजचं पॅटर्न शिवू शकता.

काढपदराच्या साडीवर, पैठणीवर हे ब्लाऊज पॅटर्न सुंदर दिसेल.