बटाट्याची सालं कचरा समजून फेकता? चेहरा उजळवून टाकणारा उपाय-आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 19:05 IST2025-04-30T19:00:00+5:302025-04-30T19:05:01+5:30

Potato peel benefits for skin: Potato peel for dark circles: कचरा समजून फेकून देणाऱ्या बटाट्याची सालं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

बटाट्याचा वापर जवळपास प्रत्येक घरामध्ये केला जातो. बटाट्याच्या भाजी, भजी, चकत्या, वडा, वेफर्स असे अनेक पदार्थ बटाट्यापासून केले जातात. (Natural remedies for dark circles)

बटाटा सोलल्यानंतर त्याची साल आपण फेकून देतो. परंतु, कचरा समजून फेकून देणाऱ्या बटाट्याची सालं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (Potato skin beauty uses)

बटाट्याची सालं हे पोषक तत्वांचा भांडार आहे. जे आपण अनेक प्रकारे वापरु शकतो. बटाट्याच्या सालीचा फायदा कसा होतो पाहूया.

बटाट्याच्या सालीमध्ये फायबर, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी सारखे अनेक पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

बटाट्याच्या साली खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते. कारण यात फायबरचे प्रमाण जास्त आहे. इतकेच नाही तर पोट बराच वेळ भरलेले राहाते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम मिळतो.

यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, जे शरीराची वाढ लवकर होण्यास मदत करते. बटाट्याची सालं हाडांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करते.

बटाटे फार जुने किंवा त्यावर अंकुर आले असतील. हिरवी बुरशी दिसत असेल तर त्याची साल वापरु नका. कारण यात सोलानाइन नावाचा विषारी पदार्थ असतो जो आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो.

आपले सौंदर्य उजळण्यासाठी देखील बटाट्याची सालं उपयुक्त आहे. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली असतील तर बटाट्याची सालं चोळावी.