बघा स्वयंपाक घरातल्या 'या' पांढऱ्या पदार्थाची जादू- त्वचा आणि केस दोन्हींसाठी ठरतो वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2024 12:20 PM2024-01-18T12:20:59+5:302024-01-18T12:27:38+5:30

हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या खूपच जास्त वाढली आहे. अगदी कॉलेजला जाणाऱ्या तरुण मुलांचे केसही आता बऱ्यापैकी पांढरे झालेले दिसतात.

शिवाय केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केसांची वाढ न होणे, या समस्याही आहेतच.

केसांच्या समस्या जशा वाढतात, तशाच त्वचेच्या तक्रारीही वाढतात.

अनेक जणींना चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स दिसणे अशा समस्या असतात. त्वचेच्या या तक्रारी आणि केसांच्या समस्या कमी करायच्या असतील तर त्यासाठी तुरटी अतिशय गुणकारी ठरते.

केस पांढरे होऊ नयेत म्हणून १ चमचा तुरटीची पावडर घ्या. त्यात २ चमचे तेल टाका आणि या मिश्रणाने केसांच्या मुळाशी मालिश करा. केस पांढरे होणार नाहीत.

हाताचे कोपरे किंवा अंडरआर्म्स काळे पडले असतील तर तुरटी पावडर आणि तेल हे मिश्रण त्या काळ्या भागावर लावा. काळपटपणा कमी होईल.

आंघोळीच्या पाण्यात ४ ते ५ वेळा तुरटी फिरवा आणि मग त्या पाण्याने आंघोळ करा. शरीराचा दुर्गंध दूर होईल.

तुरटीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत. त्वचा अधिककाळ तरुण राहण्यास मदत होते, तसेच त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होऊन त्वचेचा पोत एकसारखा होतो.