1 / 8बऱ्याच जणींची अशी तक्रार असते की त्यांचे हात- पाय बारीक असतात. पण पोटाचा घेर मात्र वाढलेला असतो. कंबरेवरही बरीच चरबी जमा झालेली असते.(how to reduce belly fat?)2 / 8अशावेळी सुटलेलं पोट कमी कसं करायचं हा प्रश्न पडतो. म्हणूनच पुढे सांगितलेले काही व्यायाम करून पाहा. काही दिवसांतच पोटावरची चरबी कमी झालेली जाणवेल.(simple exercises to get rid of belly fat)3 / 8पहिला व्यायाम म्हणजे ताडासन करा. साधारण एखादा मिनिट ताडासन करा आणि त्यानंतर मग त्याच अवस्थेत साधारण १०० पावलं चाला. 4 / 8चालत असताना जर तुम्ही हिल वॉक म्हणजेच पायाची बोट उचलून केवळ टाचा टेकवून वॉकिंग करू शकलात तर अधिक चांगले. रात्री जेवणानंतर अशा पद्धतीने वॉकिंग केले तरी चालते.5 / 8याशिवाय प्लँक किंवा स्क्वॅट्स असे व्यायाम नियमितपणे केल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास निश्चितच मदत होते.6 / 8नौकासन केल्यानेही पोटाच्या स्नायूंवर ताण येतो आणि पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.7 / 8याशिवाय सुटलेलं पोट कमी करण्यासाठी भुजंगासन करणेही खूप फायद्याचे ठरते.8 / 8सुर्यनमस्कार नियमितपणे केल्यास पोटावरची चरबी तर कमी होतेच, पण फिटनेस टिकविण्यासाठीही त्याचा उपयोग होतोच..