शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गाडीवर मिळतं तसं मऊ, जाळीदार अप्पम घरीच करा; ७ सोप्या स्टेप्स, झटपट बनेल नाश्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:13 IST

1 / 7
साऊथ इंडियन पदार्थांमध्ये प्रसिध्द असलेले अप्पम (Easy Appam Recipe) प्रत्येकालाच खायला आवडते. मऊ, जाळीदार अप्पम घरी करणंही तितकचं सोपं आहे. अप्पम करण्याच्या सोप्या स्टेप्स पाहूया. (How To Make Appam At Home)
2 / 7
अप्पम करण्यासाठी दोन वाट्या इडली किंवा डोश्याचा तांदूळ आणि अर्धी वाटी उकडलेला भात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी त्यात १ चमचा यीस्ट किंवा बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ आणि साखर घालून बारीक बेस्ट तयार करा.
3 / 7
हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात ठेवून ८ ते १० तास उबदार जागी झाकून ठेवा. पीठ दुप्पट फुगून आंबून तयार होईल.
4 / 7
आंबवलेले पीठ चांगलं ढवळून घ्या. अप्पम करण्यापूर्वी त्यात नारळाचे दूध मिसळून त्याची सुसंगता पातळ डोश्याच्या पिठासारखी करा.
5 / 7
एक खोलगट आणि गोलाकार तवा गरम करा आणि मंद आचेवर ठेवा. तव्याच्या मध्यभागी चमच्यानं पीठ घाला. लगेच पॅन दोन्ही हातांनी उचलून गोलाकार फिरवा जेणेकरून पीठ कडांना पातळ पसरून मध्यभागी जाड राहील.
6 / 7
अप्पम झाकून २ ते ३ मिनिटं शिजवा. कडा कुरकुरीत आणि मध्यभाग जाळीदार व मऊ दिसेल याची काळजी घ्या.
7 / 7
गरमागरम अप्पम तव्यावरून काढून घ्या आणि गूळ घातलेल्या नारळाच्या दुधासोबत किंवा चटणी, सांबारसोबत सर्व्ह करा.
टॅग्स :Cooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्सfoodअन्न