शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

घरी केलेला ढोकळा फसतो-फुलतच नाही; ८ टिप्स, करा विकतसारखा मऊ जाळीदार ढोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:37 IST

1 / 8
दुकानात मिळतो तसा परफेक्ट ढोकळा घरी करता येतो. पण त्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवायला हव्यात. ढोकळ्यासाठी नेहमी बारीक बेसन वापरा आणि ते वापरण्यापूर्वी चाळून घ्या. ज्यामुळे पिठात गुठळ्या राहणार नाहीत. (How To Make Perfect Khaman Dhokla At Home)
2 / 8
बेसन आणि पाणी यांचे प्रमाण अचूक ठेवा. पीठ खूप घट्ट किंवा खूपच पातळ असू नये.विकतसारखी चव येण्यासाठी पिठात थोडी साखर किंवा लिंबू सत्व किंवा लिंबाचा रस आवर्जून घाला.
3 / 8
हळद अगदी चिमूटभर घाला. जास्त हळद घातल्यानं सोडा घातल्यावर ढोकळ्यावर लाल ठिपके पडू शकतात.पिठामध्ये १ ते २ चमचे तेल घातल्यामुळे ढोकळा घशात कोरडा लागत नाही आणि मऊ होतो.
4 / 8
पीठ फेटताना नेहमी एकाच दिशेनं ५ ते ६ मिनिटं फेटा यामुळे आत हवा भरली जाते आणि ढोकळा हलका होतो.
5 / 8
मिश्रण वाफेवर ठेवण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी सोडा किंवा इनो घाला आणि त्यावर थोडं पाणी घालून हलक्या हातानं मिक्स करा.
6 / 8
ढोकळा वाफवताना गॅसची फ्लेम नेहमी मोठी ठेवा आणि पाणी आधीच उकळलेलं असावं.ढोकळा साधारणपणे १५ ते २० मिनिटं वाफवून घ्या. वारंवार झाकण उघडून पाहू नका.
7 / 8
ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यावरच त्याच्या वड्या पाडून घ्या. गरम असताना कापल्यास तो तुटू शकतो.
8 / 8
फोडणीच्या पाण्यात थोडं पाणी आणि साखर घालून ते कोमट असताना ढोकळ्यावर सगळीकडून पसरवून घ्या ज्यामुळे तो रसरशीत होतो.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स