शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

थंडीत दही नीट विरजत नाही-पाणी सुटतं-पचपचीत होतं? स्वयंपाकघरातील ६ वस्तू येतील मदतीला, दही होईल घट्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2025 20:30 IST

1 / 8
ऐन कडाक्याच्या थंडीत घरच्याघरीच विकतसारखे घट्ट व दाटसर दही लावणे म्हणजे, मोठे अवघड(how to make thick curd in winter) काम... उन्हाळ्यात दही तयार करणं जितकं सोपं असतं, तितकंच ते थंडीच्या दिवसांत तयार करणं कठीण असते. थंडीच्या दिवसांत वातावरण थंड असल्याने जीवाणूंची वाढ मंदावते आणि परिणामी, दही पाण्यासारखे पातळ, आंबट किंवा व्यवस्थित सेट न होता बिघडते. कडाक्याच्या थंडीत विकतसारखे घट्ट आणि दाटसर दही तयार करणे म्हणजे गृहिणींसाठी मोठे डोकेदुखीचे काम असते.
2 / 8
अशा परिस्थितीत, काही सोपे घरगुती उपाय आणि ट्रिक्स वापरल्या (how to make curd in winter) तर आपणही अगदी विकतसारखे परफेक्ट दही घरच्याघरीच सहज लावू शकता.
3 / 8
थंडीच्या दिवसांत दही व्यवस्थित सेट होण्यासाठी किंवा विकतसारखे घट्ट व दाटसर होण्यासाठी त्याला थोडी जास्त उष्णता आवश्यक असते. अशावेळी, आपण दह्याला विरजण लावून ते कॅसरोलमध्ये ठेवू शकता आणि वरुन त्याचे झाकण व्यवस्थित लावा. यामुळे दही एकदम विकतसारखे परफेक्ट घट्ट व दाटसर होईल. कॅसरोलमध्ये असलेली उष्णता बाहेर पडत नाही आणि त्यामुळे दही एकदम घट्ट व दाटसर होण्यास मदत मिळते.
4 / 8
जर थंडीच्या दिवसांत दही पातळ होत असेल किंवा व्यवस्थित घट्ट व दाटसर दही लागत नसेल तर त्यासाठी आपण लोकरीच्या कापडाचा वापर करू शकता. यासाठी एका माती, सिरॅमिक किंवा स्टीलच्या भांड्यात दही लावून ठेवा आणि वरुन लोकरीच्या कापडाच्या मदतीने ते भांडे चांगले झाकून ठेवा. यामुळे भांड्यातील उष्णता बाहेर पडणार नाही आणि दही एकदम घट्ट व दाटसर लागेल.
5 / 8
दही घट्ट व दाटसर करण्यासाठी आपण दह्याचे भांडं गव्हाच्या पिठाच्या डब्यात ठेवू शकता. कारण पिठाच्या डब्याच्या आत उष्णता टिकून राहते. गव्हाच्या पिठाच्या डब्यांतील नैसर्गिक उष्णता टिकून राहिल्याने दही व्यवस्थित घट्ट व दाटसर तयार होते.
6 / 8
थंडीच्या दिवसांत घट्ट व दाटसर दही घरच्याघरीच तयार करण्यासाठी त्यात थोडे मेथीचे दाणे आणि साखर देखील घालून दही लावू शकता. मेथीचे दाणे आणि साखर यामुळे किण्वन प्रक्रिया वेगाने होऊ लागते. यामुळे दही एकदम घट्ट व दाटसर होऊन व्यवस्थित सेट होते. यामुळे दही विकतसारखे परफेक्ट लागते.
7 / 8
थंडीच्या दिवसांत दही लावलेलं भांडं स्वयंपाकघरातील उबदार कोपऱ्यात किंवा ओव्हन/कुकरमध्ये ठेवावं. त्यामुळे उष्णता टिकून राहते आणि दही नीट लागतं. या उपकरणांमध्ये बाहेरची हवा जात नाही, त्यामुळे आतील तापमान टिकून राहते.
8 / 8
शक्य असल्यास दही लावण्यासाठी मातीचे भांडे वापरा. माती उष्णता शोषून घेते आणि ती जास्त काळ टिकवून ठेवते, ज्यामुळे दही घट्ट लागते. दही सेट होत असताना वारंवार भांड्याची जागा बदलू नका किंवा त्याला हलवू नका. दही सेट होण्यासाठी ते एकाच ठिकाणी स्थिर ठेवणे गरजेचे असते.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्सWinter Foodहिवाळ्यातला आहार