जीन्स घातल्यावर ढेरी दिसते? ५ स्टायलिंग टिप्स - सुटलेलं पोट अजिबात दिसणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 18:09 IST2025-06-04T07:20:32+5:302025-06-04T18:09:22+5:30

How To Wear Jeans If You Have a Belly Fat : How to wear jeans when you have a big tummy : When selecting jeans to hide belly fat, keep these expert tips in mind : 5 GENIUS Ways to Hide Belly Fat Instantly in Jeans : How to Hide Belly Fat in Jeans Easy Tips to Look Fabulous : अनेकजणी पोटाची वाढलेली ढेरी जीन्स मधून दिसते, म्हणून जीन्स घालत नाही, यासाठी पाहा खास टिप्स...

सध्या अनेकजणींना आपली पोटाची ढेरी किंवा वाढलेलं पोट हे सौंदर्यदृष्ट्या ( 5 GENIUS Ways to Hide Belly Fat Instantly in Jeans) त्रासदायक वाटतं. विशेषतः जीन्स घातल्यावर पोटाची ढेरी (How to Hide Belly Fat in Jeans Easy Tips to Look Fabulous) अधिक दिसत असल्याने काहीजणी जीन्स घालणंच सोडून देतात. जीन्स घातल्यावर पोट उठून दिसल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो, चारचौघात लाजिरवाणे वाटते. परंतु अशा परिस्थितीत, कपडे घालण्यावर बंधन आणणे योग्य नाही(How To Wear Jeans If You Have a Belly Fat).

आपल्या शरीराचा आकार समजून घेत योग्य स्टाईल, काही स्मार्ट ट्रिक्स आणि थोडा आत्मविश्वास यांच्या मदतीने आपण जीन्ससुद्धा इतक्या सहजतेने आणि सुंदरपणे घालू शकतो की, पोटाच्या ढेरीची आठवणही राहणार नाही!

स्किनी जीन्ससोबत शॉर्ट टॉप घालणं अनेक महिलांना योग्य वाटत नाही. अशावेळी जर तुम्ही थोडा लॉन्ग टॉप किंवा टी-शर्ट घातला, तर पोटाची वाढलेली ढेरी लपवता येऊ शकते. तुम्हाला जर शर्ट घालायला आवडत असेल, तर स्किनी जीन्ससोबत तो देखील छान दिसतो. फक्त जीन्स आणि टॉप किंवा शर्ट यांचे कलर कॉम्बिनेशन जुळणं महत्त्वाचं आहे.

जाड मांड्या, कंबर, नितंब, पोटाची ढेरी यामुळे जर आपण जीन्स घालणे सोडून दिले असेल तर, अशा परिस्थितीत फ्लेयर्ड जीन्स हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. अशा प्रकारच्या जीन्समुळे शरीराचा आकार संतुलित दिसतो आणि एखादा जाडजूड भाग वेगळा हायलाइट होत नाही. मात्र, फारच जास्त फ्लेयर्ड असलेली जीन्स निवडू नका. अशा प्रकारची जीन्स खूप सडपातळ किंवा जास्त जाड महिलांवर चांगली दिसत नाही आणि लुक बिघडतो.

जर तुम्हाला पोटाच्या ढेरीमुळे टॉप किंवा टी-शर्ट घालायचे नसतील, तर जीन्ससोबत आपण शॉर्ट किंवा लॉंग कुर्ती सहजपणे घालू शकतो. फ्लेयर्ड आणि स्किनी दोन्ही प्रकारच्या जीन्ससोबत कुर्ती खूपच छान दिसते. कुर्ती नेहमीच शॉर्ट असावी असं काही नाही, तुम्ही लॉंग कुर्तीही स्टाइलिश पद्धतीने घालू शकता.

पोट लपवण्यासाठी नेहमी जीन्स घेताना, तुमच्या साइजपेक्षा एक साइज मोठी जीन्स निवडा. खूप घट्ट बसणारी जीन्स घातल्यास पोट अधिक उठून दिसते. त्याचबरोबर, निळ्या रंगाच्या ऐवजी काळ्या रंगाची किंवा गडद रंगाची जीन्स खरेदी करा, कारण काळा रंग आपल्याला सडपातळ दाखवतो. याचबरोबर, अशी जीन्स निवडा जी केवळ वेस्टवरच नाही, तर मांड्यांवरसुद्धा थोडी सैल असेल. अशा प्रकारेच तुमचं शरीर अधिक संतुलित आणि परफेक्ट दिसू शकतं.

जर तुम्हाला जीन्स लूक स्टायलिश ठेवण्यासोबतच पोटाची ढेरी दिसू द्यायची नसल्यास जीन्ससोबत ब्लेझर किंवा एखादा श्रग घालू शकता. यासाठी अशा प्रकारचा टॉप निवडा जो जीन्ससोबत छान दिसेल. त्यावर तुम्ही मांड्यांपर्यंत किंवा गुडघ्यांपर्यंत असलेला श्रग किंवा जॅकेट घालू शकता. यामुळे तुमची फिगर देखील उठून दिसेल आणि तुम्हाला पोटाची ढेरी लपवण्यास मदत होईल.