तुळस लगेच सुकते-नुसत्या काड्याच काड्या? ५ ट्रिक्स; कायम बहरलेली राहील तुळस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:25 IST2025-09-09T12:22:09+5:302025-09-09T13:25:13+5:30
How To Grow Tulsi Plant (Holy Basil) At Home : तुळशीला पाणी घलताना विशेष काळजी घ्या. जास्त पाणी दिल्यामुळे तुळशीची मुळं कुजतात.

तुळशीला (Tulsi) हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे. धार्मिकदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनंही तुळस अनेक फायदे देते. तुळशीच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात. अंगणात किंवा बाल्कनीत तुळस लावली की लगेच सुकते, तुळशीची व्यवस्थित वाढ होत नाही अशी तक्रार असते. तुळशीची व्यवस्थित वाढ होण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया.(How TO Grow Tulsi Plant At Home)
तुळशीच्या रोपाला जास्त पाणी साचलेलं आवडत नाही. त्यामुळे कुंडीला खाली एक किंवा दोनपेक्षा जास्त छिद्र असतील असे पाहा. तसंच तुळशीची माती भुसभुशीत हवी. मातीत गांडूळ खत,वाळू असे मिश्रण एकत्र घालू शकता.(Easy Tricks To Grow Tulsi Plant At Home)
तुळशीला पाणी घलताना विशेष काळजी घ्या. जास्त पाणी दिल्यामुळे तुळशीची मुळं कुजतात आणि रोप सुकायला लागतं म्हणून पाणी जरा जपून घाला. माती कोरडी वाटेल तेव्हाच पाणी घाला. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी घातल्यास चांगलं ठरेल.
तुळशीच्या रोपावर कधी कधी मावा किंवा पांढरी बुरशी येते. हे टाळण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करू शकता. थोडं कडुलिंबाचं तेल पाण्यात मिसळून रोपांवर फवारणी करा. यामुळे तुळशीचं रोप किड्यांपासून सुरक्षित राहील.
तुळशीच्या रोपाच्या चांगल्या वाढीसाठी नियमित छाटणी महत्वाची आहे. तुळशीला जेव्हा मंजिरी येतात तेव्हा त्या लगेचच काढून टाका अन्यथा तुळशीचे रोप व्यवस्थित वाढणार नाही.
या रोपाला नैसर्गिक खत आवडते. शेणखत किंवा गांडूळ खत महिन्यातून एकदा तुम्ही घालू शकता. जास्त रासायनिक खतं वापरणं टाळा. यामुळे रोपाचं नुकसान ही होऊ शकतं.
चहा करून झाल्यानंतर उरलेली चहा पावडर, केळीचे साल तुम्ही या रोपात खत म्हणून घालू शकता. त्यामुळे रोपांची वाढ चांगली होते.