1 / 8साधारण पस्तिशी ओलांडली की बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन दिसू लागतात. त्वचेवर आलेल्या या काळ्या डागांमुळे चेहरा खराब दिसू लागतो.(how to get rid of pigmentation and dark spots?)2 / 8हे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी काही साधे- सोपे घरगुती उपायही आहेत. त्यापैकीच एक आहे पपईच्या सालींचा उपाय...3 / 8हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा याप्रमाणे काही दिवस नियमितपणे केल्यास पिगमेंटेशन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. त्यासाठी पपईची सालं घ्या.4 / 8ती उन्हामध्ये कडक वाळवा आणि नंतर मिक्सरधून फिरवून त्यांची पावडर करून घ्या. त्या पावडरमध्ये १ चमचा ॲलोव्हेरा जेल घाला.5 / 8त्यानंतर त्यामध्ये १ चमचा गुलाबजल घाला. आता हा लेप चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका. काही दिवस नियमितपणे हा उपाय करा. महिनाभरात पिगमेंटेशन नक्कीच कमी झालेलं जाणवेल. 6 / 8दुसरा उपाय करण्यासाठी पपईची पानंही वापरता येतील. यासाठी पपईची पानं मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्यांचा रस गाळून घ्या.7 / 8आता या रसामध्ये थोडं तांदळाचं पीठ आणि बेसन घालून त्याचा लेप करा. हा लेप चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटांनी चोळून तो काढून टाका.8 / 8यामुळे डेडस्किन, टॅनिंग जाऊन त्वचेवर छान चमक आलेली दिसेल. ट्राय करून पाहा.