शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

डोक्यांत सतत निगेटिव्ह विचार येतात ? रोज करा फक्त ५ गोष्टी - मन शांत ठेवण्याची मॅजिकल ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2026 18:14 IST

1 / 8
अनेकदा आपल्या मनात सतत नकारात्मक विचार येत राहतात आणि त्यातून बाहेर पडणं कठीण वाटू लागतं. या विचारांमुळे मन अस्वस्थ होतं, आत्मविश्वास कमी होतो आणि डेली रुटीन वरही त्याचा परिणाम होतो. अशावेळी नेमकं काय करावं हे समजत नाही. मात्र, काही सोप्या आणि सकारात्मक सवयी स्वतःला वेळीच लावाव्या, तर या नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. योग्य पद्धतीने मनाला दिशा दिली, तर हळूहळू सकारात्मकता वाढते आणि मानसिक शांतता मिळते(5 habits to get rid of negative thoughts and stay positive).
2 / 8
कधीकधी शांत बसलेलं असताना अचानक एखादा नकारात्मक विचार येतो आणि बघता बघता विचारांचं काहूर माजतं. 'माझं कसं होईल?', 'लोक काय म्हणतील?' किंवा 'काहीतरी वाईट घडणार आहे' अशी भीती सतत मनात घर करून बसते. हे नकारात्मक विचार फक्त तुमचा मूड खराब करत नाहीत, तर सोबतच तुमचा आत्मविश्वासही कमी करतात.
3 / 8
नकारात्मक विचार हे एखाद्या वाळवीसारखे असतात, जे हळूहळू तुमचा आत्मविश्वास पोखरून काढतात. बरेच लोक या विचारांना थांबवण्यासाठी धडपडतात, पण त्यांना योग्य मार्ग सापडत नाही. जर तुम्हालाही या मानसिक गुंत्यातून बाहेर पडायचं असेल, तर स्वतःला फक्त ५ साध्या सवयी लावून घ्या. या सवयी तुमचं मन शांत तर करतीलच आणि सोबत नकारात्मक विचार कमी करून आत्मविश्वास वाढवतील.
4 / 8
काही लोकांना सकाळी डोळे उघडल्याबरोबर सर्वात आधी मोबाईल फोन हातात घेण्याची सवय असते. तुमची ही एक सवय तुमच्या मानसिक आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम करू शकते. त्यामुळे, सकाळी उठल्याबरोबर किमान काही वेळ तरी फोनपासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
5 / 8
जर तुम्हाला व्यायाम न करण्याची सवय असेल, तर ती तातडीने बदलणे आवश्यक आहे. रोज सकाळी उठल्यावर किमान १५ ते २० मिनिटे व्यायाम आवर्जून केलाच पाहिजे. व्यायामामुळे तुमचे मन शांत राहते आणि तुम्ही नकारात्मक विचारांपासून कायम दूर राहता.
6 / 8
आरोग्यासाठी झोप पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमची झोप दररोज अपूर्ण राहत असेल, तर त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड वाढते आणि मनात नकारात्मक विचारांचे काहूर माजते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे गरजेचे आहे.
7 / 8
जर रिकाम्या वेळेत तुमच्या डोक्यात सतत काही ना काही नकारात्मक गोष्टी येत असतील, तर सर्वात आधी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात सतत बिझी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा मन रिकामे असते, तेव्हाच ते वाईट विचारांकडे जास्त वळते. अशावेळी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा, मग ते वाचन असो, एखादा छंद जोपासणे असो किंवा घरातील कामे असो.
8 / 8
तुमच्या डोक्यात सतत काही ना काही विचार चक्र सुरू असतील, तर त्यावर जास्त विचार करण्यापेक्षा ते एका डायरीमध्ये लिहून काढा. मनातील गोंधळ कागदावर उतरवल्यामुळे मन हलके होते. असे केल्याने तुम्ही नकारात्मक गोष्टींचा वारंवार विचार करण्यापासून स्वतःला रोखू शकता आणि तुम्हाला मानसिक स्पष्टता मिळते.
टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य