हिवाळ्यात डोक्यातला कोंडा खूपच वाढला? स्वयंपाक घरातले ४ पदार्थ लावा, काही दिवसांतच कोंडा गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2025 13:28 IST2025-11-27T13:23:07+5:302025-11-27T13:28:07+5:30

हिवाळ्यात डोक्यामधला कोंडा खूप वाढतो. कोंडा व्हायला लागला की डोक्यात खूप खाज येते आणि आपण खाजवलं की कोंडा आणखी वाढतो.

त्यामुळेच हे काही घरगुती उपाय करून पाहा. डोक्यातला कोंडा लगेचच कमी होईल. शिवाय कोंडा कमी झाल्याने केस गळण्याचं प्रमाणही कमी होईल.

आंबट दही किंवा आंबट ताक घेऊन केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मसाज करा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका. कोंडा जाईल.

लिंबूसुद्धा डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. २ चमचे खोबरेल तेलामध्ये १ ते दिड चमचा लिंबाचा रस घाला. या मिश्रणाने डोक्याच्या त्वचेला मालिश करा. अर्धा ते पाऊण तासाने केस धुवून टाका. लगेचच फरक जाणवेल.

कडुलिंबाची काही पानं स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्या पानांचे बारीक काप करा आणि मिक्सरमध्ये घालून त्याचा रस करून घ्या. हा रस गाळून घ्या. आता वाटीत जमा झालेल्या पाण्यामध्ये थोडासा मध घालून डोक्याच्या त्वचेला लावा. कडुलिंबामध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्म डोक्यातला कोंडा कमी करतात.

कांद्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून डोक्याला लावल्यास कोंडा तर कमी होतोच पण केस गळणं कमी होऊन केसांची वाढही चांगली होते.

















