ऑफिस असो वा डेट; ५ मिनिटांत 'असा' मिळेल 'नो-मेकअप' ग्लो, प्रत्येकजण विचारेल तुमचं सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2026 19:05 IST2026-01-16T19:05:00+5:302026-01-16T19:05:02+5:30

no makeup glow: natural glowing skin: instant glow tips: मेकअप न करता ऑफिस किंवा डेटवर जायचं असेल तर काय करायला हवं पाहूया.

आजच्या धावपळीच्या जीवनात सकाळी आरशासमोर उभं राहून जड मेकअप करण्यासाठी वेळ कोणाकडेच नसतो. तरीही ऑफिसमध्ये फ्रेश दिसायचं असो किंवा डेटला नॅचरल आणि आकर्षक वाटायचं असो, ‘नो-मेकअप’ ग्लो हा प्रत्येकाचा आवडता पर्याय ठरतो.

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी महागडी उत्पादने किंवा पार्लरची गरज नसून, फक्त ५ मिनिटांची योग्य काळजी पुरेशी ठरते. मेकअप न करता ऑफिस किंवा डेटवर जायचं असेल तर काय करायला हवं पाहूया.

बाहेर जाण्याआधी चेहरा सौम्य फेसवॉशने किंवा साध्या थंड पाण्याने धुवा. ज्यामुळे त्वचेवरील धूळ, तेलकटपणा निघून जातो. थंड पाणी त्वचेतील रक्तसंचार वाढवते, ज्यामुळे चेहरा टवटवीत दिसतो.

यानंतर स्वच्छ कापडात बर्फ घेऊन हलक्या हाताने १–२ मिनिटं चेहऱ्यावर फिरवा. यामुळे ओपन पोअर्स घट्ट होतात, चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि नैसर्गिक चमक येते.

चेहरा कोरडा दिसू नये म्हणून मॉइश्चरायझर लावा. क्रीमरऐवजी कोरफडीचा गर, हायलुरॉनिक जेल किंवा जेल बेस मॉइश्चरायझर वापरल्यास त्वचा ओलसर राहते आणि नॅचरल ग्लो दिसतो.

नो- मेकअप लूकमध्ये ओठ कोरडे दिसत असतील तर लिप बाम लावा, भुवयांसाठी काही गोष्टी वापरल्या तर चेहरा अधिक फ्रेश दिसतो. यासाठी काजळ आणि मस्करा वापरा.

तसेच भरपूर पाणी प्या. घराबाहेर पडण्यापूर्वी एक ग्लास पाणी किंवा कोमट पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते, ज्याचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसतो.