शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

उन्हात फिरून चेहरा काळा पडला? घरीच फक्त २० रुपयांत करा हायड्रा फेशियल, त्वचा चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 12:57 IST

1 / 8
सध्या उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे. त्यामुळे घराबाहेर पडायलाही नकोसं होतं. पण कामानिमित्त घराबाहेर पडावंच लागतं आणि त्याचा परिणाम त्वचेवर होतो.(home hacks to remove tanning and dead skin)
2 / 8
उन्हात जाऊन आल्यानंतर त्वचा लगेचच टॅन झाल्यासारखी होते. काळवंडून जाते. त्वचेवरचा काळेपणा कमी करायचा असेल तर घरच्याघरी घरातलंच साहित्य वापरून अगदी झटपट हायड्रा फेशियल कसं करायचं ते पाहुया..(how to get hydra facial like glow at home?)
3 / 8
हे फेशियल पार्लरमध्ये जाऊन केलं तर त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. पण आता अगदी तसाच ग्लो देणारं फेशियल घरच्याघरी कसं करायचं ते पाहा..(how to get rid of tanned skin?)
4 / 8
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये कच्चं दूध, ग्लिसरीन आणि मध घ्या. याने त्वचेला २ ते ३ मिनिटे मसाज करा आणि नंतर चेहरा पुसून घ्या. हे झालं तुमचं क्लिंझिंग.
5 / 8
यानंतर एक ते दोन चमचे टोमॅटोची प्युरी घ्या. त्यामध्ये १ चमचा मध आणि १ चमचा कॉफी पावडर घाला. या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करा. त्वचेवरची घाण, धूळ, डेडस्किन, टॅनिंग निघून त्वचा अगदी स्वच्छ होईल.
6 / 8
यानंतर एका वाटीमध्ये १ चमचा साखर आणि थोडंसं नारळाचं तेल घ्या. या मिश्रणाने चेहऱ्याला मालिश करा. ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स निघून जातील आणि त्वचा स्वच्छ होईल.
7 / 8
यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे त्वचेसाठी छान फेसपॅक तयार करणे. यासाठी १ केळ कुस्करून घ्या. त्यामध्ये थोडा मध आणि थोडं कच्चं दूध घाला. तिन्ही पदार्थ व्यवस्थित कालवून हा लेप चेहऱ्याला लावा. लेप सुकत आल्यानंतर हलक्या हाताने चोळून काढून टाका.
8 / 8
यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्वचेमध्ये खूप छान बदल जाणवेल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडीmilkदूध