शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

७ दिवसांत 'डबल चिन' होईल गायब! १० मिनिटं करा 'हे' फेस योगा- जिमशिवाय मिळेल परफेक्ट 'जॉलाईन'- दिसाल तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2026 20:00 IST

1 / 7
वाढलेल्या वजनाचा आपल्या चेहऱ्यावर जास्त परिणाम होतो. डबल चिनमुळे आपला चेहरा बेढब दिसू लागतो. ज्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. अनेकदा आपलं शरीर फिट असलं तरी चेहऱ्यावरची चरबी कमी करणं कठीण होतं. अशावेळी आपण महागडे कॉस्मेटिक ट्रिटमेंट किंवा सर्जरी करण्याऐवजी फेस योगा करणं फायदेशीर आहे. (Lose Double Chin)
2 / 7
दिवसातून १० मिनिटे आपण व्यायाम केल्याने चेहऱ्याच्या स्नायूंना टोन होण्यास मदत होते. तसेच मॉडेलसारखी शार्प जॉलाईन मिळते. फेस योगा केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि आपण वयापेक्षा तरुण दिसू लागतो. ७ दिवसांत आपल्याला फरक दाखवणारे सोपे फेस योगा कोणते ते पाहूया. (Face Yoga for Jawline)
3 / 7
चिन लिफ्ट हा फेस योगा आपल्या गळ्याच्या आणि जबड्याच्या स्नायूंना ताणण्यासाठी उत्तम आहे. यासाठी आपल्याला ताठ बसावे लागेल. डोके मागे झुकवून छताकडे पाहा. ओठ अशाप्रकारे बंद करा जसे की आपण छताचे चुंबन घेत आहोत. ५ ते १० सेकंद या स्थितीत राहा आणि नंतर पुन्हा नॉर्मल व्हा. असं १० वेळा करा.
4 / 7
गालावरची चरबी कमी करण्यासाठी फेस फिश व्यायाम चांगला आहे. यासाठी आपले गाल आणि ओठ आतल्या बाजूला खेचा. जसा माशाचा चेहरा असचो. १० ते १५ सेकंद असेच राहून मग रिलॅक्स व्हा. ५ ते १० वेळा असं करा.
5 / 7
गालावरची चरबी कमी करण्यासाठी फेस फिश व्यायाम चांगला आहे. यासाठी आपले गाल आणि ओठ आतल्या बाजूला खेचा. जसा माशाचा चेहरा असचो. १० ते १५ सेकंद असेच राहून मग रिलॅक्स व्हा. ५ ते १० वेळा असं करा.
6 / 7
ज्युटिंग जबडा या योगामुळे आपले डबल चीन कमी होण्यास मदत होते. यासाठी आपले डोके मागे झुकवा आणि छताकडे पहा. खालचा जबडा शक्य तितका पुढे ढकला. जोपर्यंत हनुवटीच्या खाली ताण जाणवत नाही. १० सेकंद थांबा आणि पुन्हा करा.
7 / 7
गळ्यावर चरबी वाढली असेल आणि मानदुखी दोन्हीवर उपाय म्हणजे नेक रोल. आपले डोके उजवीकडून डावीकडे नंतर डावीकडून उजवीकडे गोल फिरवा. हे करताना खांदे स्थिर ठेवा. यामुळे मानेचा भाग लवचिक होते. ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी