गॅसच्या शेगडीचं काळंकुट्टं बर्नर एका मिनिटांत होईल साफ, 'हा' पदार्थ करतो स्वच्छ चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2025 16:48 IST2025-04-12T16:26:49+5:302025-04-12T16:48:49+5:30

गॅस शेगडी आणि ओटा आपण नेहमीच स्वच्छ करतो. पण म्हणावं तेवढं लक्ष गॅस बर्नरकडे देणं होत नाही.

रोजच्या रोज गॅस बर्नर आपण स्वच्छ करत नाही. त्यामुळे मग ते खूपच जास्त काळवंडून जातात.

बऱ्याचदा तर त्या बर्नरच्या जाळीमध्ये घाण अडकून गॅस मंद होऊन जातो. म्हणूनच गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी हा एक सोपा उपाय आता करून पाहा..

सगळ्यात आधी गॅस बर्नर शेगडीवरून काढून घ्या आणि खराब टुथब्रश वापरून ते आतल्या बाजुने स्वच्छ करून घ्या.

यानंतर एका भांड्यामध्ये चिंचेचा कोळ करा आणि त्या गरम पाण्यामध्ये गॅस बर्नर १० ते १२ मिनिटांसाठी भिजत ठेवा.

यानंतर पुन्हा एकदा घासणीने ते स्वच्छ घासून काढा.. गॅस बर्नर अगदी स्वच्छ चकाचक होईल.