मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
1 / 7आपल्याकडे बहुतांश घरांमध्ये केसांसाठी किंवा अंगाला मालिश करण्यासाठी सरसकट खोबरेल तेलाचीच निवड केली जाते. 2 / 7पण हे तेल सगळ्यांसाठीच एकसारखं उपयुक्त ठरतं असं नाही. त्यामुळेच तर आपल्या पाहण्यात दोन प्रकारचे लोक येतात. पहिला प्रकारातले लोक खोबरेल तेल केसांना लावतात पण त्यांचे केस खूप पातळ असतात. केस गळण्याने ते लोक वैतागलेले असतात.3 / 7पण त्याउलट दुसऱ्या प्रकारात अशा व्यक्ती असतात ज्या केसांना खोबरेल तेलच लावतात. पण तरीही त्यांचे केस खूप दाट, लांबसडक असतात. असं होण्यामागचं कारण हेच आहे की कोणतंही तेल सरसकट सगळ्यांसाठीच सर्वोत्तम असेल असं नाही.4 / 7याविषयीचा एक व्हिडिओ merishrushti या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की मानवी शरीराच्या पित्त, वात या प्रकृतीनुसार तेलाची निवड करावी.5 / 7उदा. जे लोक पित्त प्रकृतीचे असतात त्यांचे शरीर थोडे उष्ण असते. म्हणजेच अशा लोकांनी थंड प्रकृतीच्या तेलाची निवड केली पाहिजे. खोबरेल तेल हे थंड प्रकृतीचे तेल आहे. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरते.6 / 7वात प्रकृती असणाऱ्या लोकांचे शरीर थंड असते. त्यामुळे अशा लोकांसाठी उष्ण तेल फायदेशीर ठरते. त्यामुळे वात प्रकृती असणाऱ्या लोकांनी मोहरीचे किंवा तिळाचे तेल लावण्यास प्राधान्य द्यावे. त्यामुळे त्यांच्या शरीराला आणि केसांना अधिक फायदा होऊ शकतो. 7 / 7जर तुम्ही कफ प्रकृतीचे असाल तर तुमच्यासाठी मोहरी, जोजोबा किंवा टी- ट्री ऑईल अधिक फायदेशीर ठरते.