By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:28 IST
1 / 8केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी कांद्याचा रस हा एक अत्यंत प्रभावी घरगुती उपाय आहे. कांद्यामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. याचा वापर नियमित केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. (How To Apply Onion On Hairs To Get Long Hairs)2 / 8 सगळ्यात आधी एक मध्यम आकाराचा कांदा सोलून तो किसून घ्या किंवा मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर सुती कापडानं गाळून त्याचा ताजा रस काढा.3 / 8 कापसाचा गोळा रसात भिजवून तो थेट केसांच्या मुळांना लावा. संपूर्ण डोक्याला रस लावल्यानंतर हलक्या हातानं ५ ते १० मिनिटं मसाज करा.4 / 8जर तुम्हाला कांद्याचा उग्र वास सहन होत नसेल तर त्यात थोडं नारळ तेल किंवा एरंडेल तेल लावा. यामुळे केसांमधील ओलावा टिकून राहतो.5 / 8हा रस केसांवर किमान ३० मिनिटं ते १ तास राहू द्या. त्यानंतर सौम्य शॅम्पूनं केस धुवून घ्या.6 / 8 चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून किमान दोनदा हा प्रयोग करा. कांद्यातील सफ्लरमुळे कोलोजनचे उत्पादन वाढते. ज्यामुळे नवीन केस येण्यास मदत होते. 7 / 8 यातील एंटी बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे कोंडा आणि टाळूचे इन्फेक्सन कमी होते. अकाली पांढरे होणाऱ्या केसांच्या समस्याही यामुळे होऊ शकतात.8 / 8जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर पूर्ण डोक्याला रस लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करून पाहा.