ना पदर निसटण्याची भीती, ना पिनची झंझट! नेसा रेडी टू वेअर, हॅन्ड फ्री कफ्तान साडी - आता साडी नेसणं झालं सुपरईझी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2026 10:45 IST2026-02-22T10:45:00+5:302026-02-22T10:45:02+5:30

hand free kaftan saree : kaftan style saree pattern : kaftan saree design : ready to wear kaftan saree : कफ्तानचा कम्फर्ट आणि साडीच्या एलिगन्सचा सुंदर मिलाफ असलेली हॅन्ड फ्री कफ्तान साडी...

साडी हा प्रत्येक महिलेला शोभून दिसणारा पारंपरिक आणि आकर्षक पेहराव असला तरी अनेक महिलांना साडीचा पदर सांभाळणे, वारंवार पिन लावणे किंवा सतत पदर नीट ठेवण्याची झंझट त्रासदायक वाटते. विशेषतः लग्नसमारंभ, पार्टी किंवा दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये पदर सावरताना अनेकदा अस्वस्थता जाणवते. अशावेळी साडीच्या फॅशनमध्ये आलेली हॅन्ड-फ्री कफ्तान साडी ही स्टाईल महिलांसाठी परफेक्ट पर्याय ठरत आहे(hand free kaftan saree).

साडी नेसणं ही एक कला आहे, पण पदर सावरण्याची कसरत आणि सेफ्टी पिनच्या (kaftan style saree pattern) टोचण्यामुळे अनेकजणी साडी नेसायला कंटाळतात. तुमच्या याच समस्येवर आता एक स्टायलिश तोडगा आला आहे - 'हॅन्ड फ्री कफ्तान साडी'(ready to wear kaftan saree).

कफ्तानचा कम्फर्ट आणि साडीच्या एलिगन्सचा सुंदर मिलाफ (ready to wear kaftan saree) असलेली ही साडी नेसायला सोपी, स्टायलिश आणि पूर्णपणे हॅन्ड फ्री आहे. पदराची काळजी न करता मोकळेपणाने वावरता येते आणि तरीही पारंपरिक लूक कायम राहतो.

या हँड - फ्री कफ्तान साडीच्या पदराच्या बरोबर मध्यभागी एक मध्यम गोलाकार आकाराचे छिद्र असते. या छिद्रांतून हात घालून आपण आपल्या हातांच्या कोपरावर हा पदर होल्ड करून ठेवू शकतो. कोपराजवळ पदर होल्ड केल्याने आपल्याला तो हातात पकडण्याची गरजच पडत नाही किंवा पदर खांद्यावरून निसटण्याचे किंवा ढीगभर पिना लावून पिनअप करण्याची गरजच भासत नाही. इतकच नाही आपण हा पदर खांद्यावरून न घेता थेट पदराला असणाऱ्या छिद्रातून गळ्यात देखील घालू शकतो, यामुळे खांदयावर पदर लावून तो सावरत बसण्याची झंझटच उरत नाही... स्टाईल आणि कम्फर्ट दोन्ही एकत्र...

'हॅन्ड फ्री कफ्तान साडी' चा पदर हा कफ्तान स्टाईलने डिझाईन केलेला असतो. म्हणजेच, तुम्हाला पदराला हाताने सावरण्याची किंवा डझनभर पिन लावण्याची मुळीच गरज नाही. एका बाजूला साडीचा लुक आणि दुसऱ्या बाजूला कफ्तानचा कम्फर्ट अशा या 'फ्युजन' स्टाईलने सध्या फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ घातला आहे.

ही साडी नेसायला अत्यंत सोपी आहे. अनेक कफ्तान साड्या तर 'रेडी टू वेअर' (Ready to wear) स्वरूपातही उपलब्ध आहेत. कफ्तान स्टाईल सैलसर असल्यामुळे ती सर्व प्रकारच्या शरीरयष्टीवर उठून दिसते.

पदरालाच स्लीव्हजचा (Sleeves) आकार दिल्यामुळे ही साडी तुमच्या शरीराचाच एक भाग होऊन जाते. साडीचा तोच तोचपणा मोडून काहीतरी 'विचित्र' न करता 'विशिष्ट' दिसायचं असेल, तर ही स्टाईल नक्कीच ट्राय करायला हवी."

सण-समारंभासाठी सिल्क फॅब्रिकमधील कफ्तान साडी, ज्याला गडद काठ असतील अशा 'हॅन्ड-फ्री कफ्तान साड्या' अत्यंत देखण्या दिसतात.

कमरेला स्टायलिश बेल्ट लावून अधिक 'बोल्ड' आणि 'फिटेड' लुक दिलेली कफ्तान साडी नाईट फंक्शनसाठी विशेष शोभून दिसते.

इंडो-वेस्टर्न टच असलेली, चकाकणारी (Sequins) कफ्तान साडी जी कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट आहे.

सध्या अनेक अभिनेत्री रेड कार्पेटवर कफ्तान साडीमध्ये दिसत आहेत.