केसांची वाढच होत नाही- खूप पातळ झालेत? जावेद हबीब सांगतात ७ उपाय, केस वाढतील भरभर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 15:04 IST2023-08-13T15:39:03+5:302023-08-14T15:04:16+5:30
Hair Expert Jawed Habib Tips for stop hair fall : कडुलिंबाच्या पानांत एंटी फंगल एंटी बॅक्टेरिअल गुण असतात.

केस गळण्याची समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांमध्येच उद्भवते. केस गळणं थांबवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची तेलं उपलब्ध आहेत. पण त्याचा प्रत्येकाच्याच केसांवर उपयोग होतोच असं नाही. केस वाढवण्यासाठी हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. (Tips To Control Hair Fall By Hair Expert Jawed Habib)
केस गळणं थांबवण्यासाठी नारळाचं तेल एका वरदानाप्रमाणे आहे. नारळाच्या अनेक पोषक घटक असतात. आठवड्यातून २ ते ३ वेळा या तेलांने केसावर मसाज केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.
आवळ्यात अनेक पोषक घटक असतात. आवळ्याचा हेअर पॅक मेहेंदीत मिसळून केसांना लावल्याने केसांचा नैसर्गिकरंग टिकून राहतो. याशिवाय आवळ्याचा रसही तुम्ही केसांच्या मुळांना लावू शकता.
ग्रीन टी एक उत्तम हेअर रिग्रोथ ट्रिटमेंट आहे. ग्रीन टी केसांना लावल्यास केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते.
एलोवेरा जेल केसांना लावल्यानं केस मजबूत होतात आणि केसगळती सुद्धा थांबते.
कांदा सल्फरयुक्त असतो. कांद्याच रस केसांना लावल्याने केसांची वाढ चांगली होते.
कडुलिंबाच्या पानांत एंटी फंगल एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट केसांना लावल्यास केस काळेभोर - दाट होतात.
दही आणि मध केसांना लावल्यानं केसांचा टेक्सचर सुधारतो. केस लांबसडक होतात आणि कोरडेपणा निघून केस व्यवस्थित दिसतात.