शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

झाडांची पानं सुकली- पिवळी पडून गळू लागली? रोपांना घाला 'पांढरं' पाणी- पुन्हा होतील हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2024 10:18 AM

1 / 7
बऱ्याचदा असं होतं की रोपांची पानं पिवळी पडून गळू लागतात. रोपं सुकू लागतात.
2 / 7
आपण त्यांना पाणी तर नियमितपणे देतो. पण तरी असं का होतं ते कळत नाही. तुमच्या झाडांची पानं पिवळी पडून गळत असतील तर त्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे झाडांना पोटॅशियम आणि नायट्रोजन कमी प्रमाणात मिळत आहे. त्यासाठीच हा एक घरगुती उपाय करून बघा.
3 / 7
सगळ्यात आधी वाटीभर तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर त्यांच्यात एक लीटर पाणी टाकून ते भिजत ठेवा.
4 / 7
या पाण्यात अर्धी वाटी सोयाबीन घाला.
5 / 7
त्याचा पाण्यात थोडा बारीक चिरलेला कांदा घाला.
6 / 7
२० मिली व्हाईट व्हिनेगर घालून ते पाण्याचं भांडं प्लास्टिकच्या पिशवीने झाकून घ्या आणि २ ते ३ दिवस उन्हात राहू द्या.
7 / 7
२ ते ३ दिवसांत ते पाणी चांगलं फर्मेंट झालं की ते गाळून घ्या आणि झाडांना घाला. थोडं पाणी पानांवरही शिंपडा. यामुळे झाडांना योग्य ती पोषणमुल्ये मिळतील आणि त्यांची आणखी जोमात वाढ होईल.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सPlantsइनडोअर प्लाण्ट्सWaterपाणी