Floral Jewellery For Haldi : लग्नात हळद समारंभासाठी खास फ्लोरल ज्वेलरी; पाहा १० युनिक आयडीया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:31 IST2024-12-18T12:26:13+5:302024-12-18T16:31:49+5:30
Floral Jewellery For Haldi :

आपल्या हळदीला आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक मुलीला वाटते. हळदीच्या दिवशी पारंपारीक ज्वेलरी न घालता आजकाल फुलांची ज्वेलरी घालतात.
फ्लोरल ज्वेलरी तुम्हाला आर्टिफिशियल आणि रिअल फुलांनामध्ये २ पर्यायंमध्ये उपलब्ध होईल.
या ज्वेलरीमध्ये बिंदी, कानातले, गळ्यातला हार, बाजूबंद, टियारा, हातातले ब्रेसलेट, अंगठी हे साहित्य असते.
आर्टिफिशियल फुलांची ज्वेलरी तुम्हाला कोणत्याही नॉवेल्टी शॉपमध्ये २५० रूपयांपासून ते ६०० रूपयांपर्यंत मिळेल.
रिअल फुलांची ज्वेलरी तुम्हाला २००० ते ३००० रूपयांपर्यंत मिळेल.
जिप्सी,गुलाबाची फुलं, झेंडू, मोगरा, ऑर्किड्स अशा वेगवेगळ्या तुमच्या आवडीच्या फुलांमध्ये तुम्ही ही ज्वेलरी बनवून घेऊ शकता.
खासकरून जिप्सी आणि गुलाबांचा वापर असलेली ज्वेलरी सुंदर लूक देते. तुम्ही केसांमध्ये जिप्सी आणि गुलाबांच्या फुलांचा वापर करू शकता.
या ज्वेलरीची खासियत अशी की लेहेंगा असो, साडी कशावरही शोभून दिसते.
पिवळ्या रंगाच्या साडीवर तुमही हिरव्या आणि पिवळ्या फुलांचे कॉम्बिनेशन असलेली ज्वेलरी निवडू शकता.
जर आर्टिफिशियल ज्वेलरी घेतली तर तुम्ही पुन्हा दुसऱ्यांदाही वापरू शकता. कारण ही ज्वेलरी लवकर खराब होत नाही.