शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

नारळ न वापरता पांढरी चटणी करण्याची सोपी पद्धत; इडलीचटणीचा हा बेत एकदम चविष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:53 IST

1 / 7
नारळ न वापरता अगदी नारळाच्या चटणीसारखीच चव आणि पांढराशुभ्र रंग देणारी चटणी आपण भाजलेली डाळी किंवा शेंगदाणे वापरून करू शकता. ही चटणी चवीला उत्कृष्ट लागते आणि झटपट तयार होते. (Coconut Chutney Without Coconut)
2 / 7
अर्धी वाटी भाजलेली डाळवं किंवा सालं काढलेले भाजलेले शेंगदाणे घ्या. यामुळे चटणीला पांढरा रंग आणि दाटपणा येतो. चिरलेला पांढरा कांदा भाजून घ्या.
3 / 7
त्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आल्याचा एक छोटा तुकडा आणि चवीनुसार मीठ घाला.
4 / 7
नारळासारखा पांढरा रंग येण्यासाठी आंबट-गोड चवीनसाठी 2 चमचे ताजं दही मिसळू शकता.
5 / 7
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, कढीपत्ता आणि हिंगाची खमंग फोडणी तयार करा.
6 / 7
ही फोडणी चटणीवर ओता. तुमची नारळाशिवाय केलेली पांढरी चटणी तयार आहे. चटणीचा रंग पांढरा राहण्यासाठी त्यात लसूण किंवा जास्त कोथिंबीर घालणं टाळा. लसणामुळे चटणीला पिवळसर किंवा करडा रंग येऊ शकतो. तर कोथिंबीरीमुळे ती हिरवी होईल.
7 / 7
जर तुम्हाला चटणी अधिक शाही आणि क्रिमी हवी असेल तर तुम्ही डाळवांऐवजी 5 ते 6 काजू किंवा थोडे भाजलेले मखाने वापरू शकता. यामुळे चटणीला नैसर्गिक पांढरा शुभ्र रंग येतो आणि चवही हॉटेलच्या चटणीसारखी लागते.
टॅग्स :Cooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स