डोरी ब्लाऊज डिझाईन्स! ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे लेटेस्ट पॅटर्न्स, दिसाल सुपरस्टायलिश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2025 15:14 IST2025-06-21T15:08:08+5:302025-06-21T15:14:43+5:30

अशा पद्धतीचे डोरी ब्लाऊज सध्या खूप ट्रेण्डिंग असून त्यात कित्येक नवनविन प्रकारचे डिझाईन्स शिवून मिळत आहेत.

डोरी ब्लाऊज म्हणजे त्या ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने डोरी म्हणजेच दोरी लावलेली असते.

हे ब्लाऊज खूप स्टायलिश लूक मिळवून देत असल्याने तरुण मुलींमध्ये त्याची प्रचंड क्रेझ आहे.

पार्टीवेअर साडी असेल तर त्यावर असं एखादं ब्लाऊज शिवायलाच हवं.. त्यामुळे साडीला एकदम गेटअप येतो आणि तुमचा लूकही खूप बदलून जातो.

काठपदर साड्यांवरही अशा पद्धतीने डोरी ब्लाऊज शिवता येतं..

डोरी ब्लाऊज मात्र परफेक्ट फिटिंगचंच असायला हवं. कारण ते थोडं सैल किंवा थोडं घट्ट जरी झालं तरी ते खूप विचित्र वाटतं.

डोरी ब्लाऊज फक्त साड्यांवरच घालता येतं असं नाही. तर घागरा, चनियाचोली या प्रकारातली ते खूप छान वाटतं.

डोरी ब्लाऊज आणि त्याला खूप मोठे लटकन अशी फॅशनही सध्या आहेच...