शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला पित्त इतकं छळतं की जीव नको झाला? ५ पदार्थ विसरुन जा, भडकलेली ॲसिडिटी कायमची बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2025 17:01 IST

1 / 7
आपल्या आहारात असे काही पदार्थ असतात जे पित्तकारक असतात. त्यामुळे हे पदार्थ जास्त खाणे आरोग्यासाठी चांगले ठरत नाही. त्यातील काही घटक पित्त प्रवृत्ती असणाऱ्यासाठी वाईट ठरतात.
2 / 7
जसे की वाल - पावटा. हे पदार्थ गॅसेस वाढवतात. तसेच पित्तही वाढवतात. त्यामुळे पावटा खाताना काळजी घ्यायला हवी. पाणीही जास्त प्यायचे.
3 / 7
नारळ हा पदार्थ आहारात असायलाच हवा. मात्र जर पित्ताचा त्रास असेल तर फोडणीत नारळ घालणे टाळा. त्यामुळे पित्त वाढतं आणि उलट्याही होतात. त्यामुळे नारळ प्रमाणातच खावा.
4 / 7
मेथी मुळात गरम असते. गरम पदार्थ शक्यतो पित्तकर असतात. त्यामुळे मेथी खाताना नुसती खात नाहीत सोबत काहीतरी असते ज्यामुळे पित्त आटोक्यात राहील. मेथी फार पौष्टिक असते, फक्त प्रमाणात खावी.
5 / 7
तसेच भरपूर पोषण असले म्हणजे पदार्थ पित्तकारक नाही असे होत नाही. त्यामुळे उडदाची डाळ कितीही पोषण देणारी असली तरी त्यामुळे पित्त वाढते.
6 / 7
मसूर डाळीमुळे पित्त वाढते. जास्त नाही पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेवणात मसूर असले ती तूप, दूध, ताक असे पदार्थ असायला हवेत.
7 / 7
टोमॅटो अति खाल्यामुळेही पित्त वाढू शकते. तसा टोमॅटो जास्त त्रासदायक नसला तरी तो अॅसिडिक असतो. त्यामुळे जास्त परतून खाल्यावर तसेच जास्त खाल्यावर पित्त वाढू शकते.
टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स