शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रात्री चांगली झोप हवी असेल तर करू नका 'या' चुका; स्लीप सायकलवर होईल परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:50 IST

1 / 10
निरोगी राहण्यासाठी रात्री चांगली झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. रात्री किमान ७-८ तास झोप घ्यावी असा नेहमीच सल्ला दिला जातो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
2 / 10
जेव्हा आपल्याला रात्री नीट झोप येत नाही, तेव्हा सकाळी खूप थकवा आणि डोकेदुखी जाणवते. झोपेचा अभाव चिंता, ताण आणि नैराश्यासारख्या परिस्थितींशी देखील जोडला गेला आहे. यामुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयरोग इत्यादींचा धोका वाढतो.
3 / 10
रात्री नीट झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतात. तुमच्या काही दैनंदिन सवयी तुमच्या झोपेवरही परिणाम करू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी आपण अनेक चुका करतो ज्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतो. त्याबाबत जाणून घेऊया...
4 / 10
चहा-कॉफीमध्ये कॅफिन असतं, जे तुमच्या मेंदूला जागृत ठेवतं. रात्री जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेतल्याने रात्री झोप येत नाही. चॉकलेट, सोडा आणि एनर्जी ड्रिंक्समध्येही कॅफिन असतं.
5 / 10
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉपचा जास्त वापर केल्याने तुमच्या डोळ्यांवर खूप ताण येतो. यामुळे तुम्हाला झोप येण्यासही त्रास होतो. याशिवाय रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहू नये.
6 / 10
बरेच लोक सकाळी किंवा संध्याकाळी थोडीशी झोप घेतात, पण असं केल्याने तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागे राहू शकता. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर थंड पाण्याने डोळे धुवा.
7 / 10
जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी किंवा रात्री उशिरा काहीतरी जड खाल्लं तर त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. कारण ते शरीराला ऊर्जा प्रदान करतं आणि मेंदूला सक्रिय करू शकतं.
8 / 10
दारू पिल्यानंतर तुम्हाला लवकर झोप येऊ येते. पण झोपेच्या वेळी अस्वस्थता आणि वारंवार डोळे उघडणे यासारख्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं.
9 / 10
झोपण्यापूर्वी किमान ३-४ तास व्यायाम केल्याने आपला मेंदू आणि शरीर खूप सक्रिय होते. म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
10 / 10
दिवसभर भरपूर पाणी पिणं चांगलं आहे, परंतु रात्रीचे पाणी कमी प्या. कारण त्यामुळे तुम्हाला रात्री वारंवार उठावं लागू शकतं आणि तुमची झोप बिघडते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य