शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

राम नवमी 2026 : भारतात प्रत्येक राज्यात रामनवमीसाठी केले जाणारे खास पदार्थ, पाहा कोणत्या राज्यात कोणता प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2026 16:23 IST

1 / 7
कुठलाही सण असला की त्या सणाला आपल्याकडे एक खास पदार्थ करण्यात येतो. हा पदार्थ प्रत्येक राज्यागणिक वेगवेगळा असतो. म्हणजेच आता होळीला महाराष्ट्रात पुरणपोळी करतात तर गुजरातमध्ये गुज्जिया करतात.. बंगालमध्ये रसगुल्ला असतो तर दक्षिणेत पायसम असते...
2 / 7
तसंच काहीसं रामनवमीचंही आहे. श्रीरामाच्या नैवेद्यासाठी प्रत्येक प्रांतात वेगवेगळा पदार्थाला महत्त्व आहे. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहुया...
3 / 7
उत्तर भारत, दिल्ली, बिहार या भागात श्रीराम नवमीला धण्याची पंजिरी केली जाते. त्याशिवाय केशर भात आणि खीर पुरीचा नैवेद्यही दाखवला जातो.
4 / 7
महाराष्ट्रातही पंजिरी करण्यात येते. पण त्यासोबतच सुंठवडाही आवर्जून केला जातो. सुंठवड्यामध्ये सुंठ, खोबरं आणि वेगवेगळा सुकामेवा असतो.
5 / 7
गुजरातमध्ये रामनवमीला श्रीखंड केलं जातं. तसेच तिथल्या मंदिरांमध्ये साबुदाणा खिचडी किंवा वडे प्रसाद म्हणून वाटले जातात.
6 / 7
अयोध्येला तर रामनवमीचा मोठाच उत्सव असतो. यावेळी तिथे श्रीरामरायाला छप्पनभाेग अर्पण केला जातो.
7 / 7
दक्षिण भारतामध्ये पनकम हे गूळ, लिंबू आणि आलं घातलेलं पेय रामाला नैवेद्य म्हणून दाखवलं जातं. तर नारळाच्या लाडवांचा प्रसादही वाटला जातो. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी हे पेय अतिशय उत्तम आहे. त्यामुळेच कदाचित तेथे रामनवमीला या प्रसादाचे महत्त्व असावे.
टॅग्स :Ram Navamiराम नवमीfoodअन्न