शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

चमचाभर दह्यात घाला चिमूटभर हळद, त्वचेला मिळतील ५ जादुई फायदे, पाहा नेमकं करायचं काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2026 09:35 IST

1 / 8
टॅनिंग, पिंपल्स घालवून त्वचेवर छान ग्लो हवा असेल तर पुढे सांगितलेला एक अतिशय सोपा घरगुती उपाय करून पाहाच.(curd turmeric face mask for glowing skin)
2 / 8
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दही लागणार आहे. दह्यामध्ये असणारं लॅक्टीक ॲसिड त्वचेला छान मॉईश्चराईज करतं.(use of curd for skin care)
3 / 8
याशिवाय हळदीमध्ये असणारे ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टी इन्फ्लेमेटरी घटक पिंपल्स, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स कमी करण्यास मदत करतात. त्यामुळेच हळद आणि दही या दोन्हींचा उपयोग करून त्वचेचं सौंदर्य कसं खुलवायचं ते पाहुया...(how to use curd and turmeric for skin care?)
4 / 8
हा उपाय करण्यासाठी १ चमचा दही घ्या. त्यामध्ये १ टीस्पून हळद घाला. आता दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि त्याचा लेप चेहऱ्यावर लावा. १० ते १२ मिनिटांनी लेप सुकत चालल्यावर तो चोळून काढून टाका.
5 / 8
हा उपाय आठवड्यातून २- ३ वेळा करू शकता. यामुळे पिंपल्स आणि पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत होते.
6 / 8
उन्हाळ्यात अनेकांना सनबर्नचा त्रास होतो. हा लेप रॅशेस आलेल्या भागात लावल्यास सनबर्न कमी हाेण्यास मदत होते. त्या भागात होणारी जळजळ, आग थांबते.
7 / 8
टॅनिंग कमी करून चेहऱ्यावर छान ग्लो येण्यासाठीही दही आणि हळद यांचं मिश्रण उपयुक्त ठरतं.
8 / 8
ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनाही या फेसमास्कचा उपयोग होतो. कारण दह्यामध्ये असणारं लॅक्टीक ॲसिड त्वचेला मऊ, कोमल बनवतं आणि हायड्रेटेड ठेवतं.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीSummer Specialसमर स्पेशलHome remedyहोम रेमेडी