शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1, त्याची लक्षणं कोणती? संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:41 PM

1 / 7
नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या सुरूवातीलाच कोरोना व्हायरसच्या धोकादायक व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाला आहे. ज्यामुळे लोक वेगाने या आजाराच्या विळख्यात अडकत आहेत. महाराष्ट्रात या व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. वेळीच लक्षणांकडे लक्ष न दिल्यास रुग्णाची स्थिती अधिक खालावू शकते. या आजाराची लक्षणं काय आहेत ते समजून घेऊया.(Covid Sub Variant JN.1 Symptoms and Preventions)
2 / 7
कोरोनाचा हा व्हेरिएंट ओमीक्रोन BA.2.86 या कुटुंबातील आहे आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने या व्हेरिएंटला धोकादायक दर्शवत व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट या श्रेणीत ठेवले आहे.
3 / 7
आधीच्या व्हेरिएंटपेक्षा हा व्हायरस अधिक संक्रामक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. JN.1 व्हेरिएंट स्ट्रेन पहिल्यांदा ८ डिसेंबरला तिरूवनंतपुरममध्ये आढळून आला. त्याची सगळ्यात पहिला रुग्ण अमेरिकेत सापडला होता.
4 / 7
JN.1 स्ट्रेनची प्रकरणं वेगानं वाढत आहेत. म्हणून लक्षणांकडे दुर्लक्ष करणं आरोग्यासाठी मोठी चूक ठरू शकते. या आजाराच्या लक्षणांमध्ये गळणारं नाक, घसा खराब होणं, डोकेदुखी, गॅस्ट्रोइंस्टेस्टायनल प्रोब्लेम्स, थकवा येणं, मांसपेशींमध्ये वेदना अशी लक्षणं जाणवतात.
5 / 7
कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटने बाधित होणाऱ्या लोकांना अपर रेस्पिरेटीरी लक्षणं जाणवत आहेत. ४ ते ५ दिवसांत ही लक्षणं कमी होत जातात.
6 / 7
काही प्रकरणांमध्ये कोरोनाबाधित लोकांना भूक कमी लागणं, उलटी होणं अशी लक्षणं दिसून आली होती. तुम्हाला अशी लक्षणं जाणवत असतील तर जराही दुर्लक्ष करू नका.
7 / 7
शासनाकडून लोकांना कोविड-१९ शी संबंधित नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी वैयक्तीक खबरदारी घ्यायला हवी. घाबरण्याची गरज नसल्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लहान मुलं-घरातील वयस्कर मंडळींंची अधिक काळजी घ्या.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या