1 / 9जेवताना ताटामध्ये विविध चवींचे पदार्थ असले की जेवायला मस्त मज्जा येते. एका बाजूला पोळी भाजी आणि दुसर्या बाजूला लोणचे, ठेचा, चटणी, पापड असे प्रकार असले की ताट छान भरल्या सारखे वाटते. 2 / 9चटणी हा पदार्थ आपण वरचेवर करतोच. चटणी हे फार लोकप्रिय असे तोंडीलावणे आहे. करायलाही फार वेळ लागत नाही. अगदी झटपट करता येते.3 / 9पण नेहमी एकाच चवीची चटणी खाण्यात काही मज्जा नाही. त्यामध्ये काही तरी नाविन्य असायला हवे. विविध प्रकारच्या चटण्या करता येतात. सगळ्याच अगदी झटपट होतात. 4 / 9महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच ही नारळाची चटणी केली जाते. सणासुदीला तसेच लग्न समारंभांमध्येही ही नारळ कोथिंबीरीची चटणी केली जाते. 5 / 9दाण्यांची सुकी चटणी केली जाते आणि ओली चटणीही करतात. या चटणीला मस्त कडीपत्याचा तडका दिल्यावर तिची चव दुप्पट होते. त्यामध्ये छान गोड दही घाला. 6 / 9तुम्ही कधी पोहे घालून चटणी केली आहे का? डाळं, कोथिंबीर, पोहे, हिरवी मिरची, नारळ यांच्या मिश्रणातून केलेली ही चटणी अगदीच चविष्ट लागते.7 / 9कच्च्या कांद्याची चटाकेदार चटणी नक्की खाऊन बघा. करायला अगदीच सोपी असते. तसेच पोळीबरोबर फक्त ही चटणी असली तर मग भाजीचीही गरज नाही.8 / 9टोमॅटोची चटणी तर सगळ्याच पदार्थांसोबत खाता येते. मस्त झणझणीत अशी ही चटणी फार लोकप्रियही आहे. काश्मीरी लाल मिरची घालून केलेली ही लालचुटूक चटणी इडली, डोसा तसेच वड्याबरोबर मस्त लागते. 9 / 9सध्या कैरीचा सिझन सुरू आहे. कैरीचे विविध पदार्थ तुम्ही खात असला. कैरीची चटणीही खाऊन बघा. करायला सोपी असते तसेच मस्ता आंबट गोड लागते.