Secret Santa Gift: अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:45 IST2025-12-17T16:03:29+5:302025-12-17T16:45:42+5:30

Secret Santa Gifts Ideas: जर तुम्ही तुमच्या सीक्रेट सँटाला काय गिफ्ट द्यावं याबद्दल गोंधळलेले असाल, तर तुमच्या बजेटमधल्या काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया...

दरवर्षी ख्रिसमस दरम्यान सीक्रेट सँटा हा खेळ ऑफिसमध्ये किंवा मित्रांसोबत खेळला जातो. प्रत्येकजण त्यांच्या सीक्रेट सँटाला खास भेटवस्तू देतो आणि ख्रिसमस आनंदाने साजरा करतो.

प्रत्येकजण आपल्या सीक्रेट सँटाला असं गिफ्ट देऊ इच्छितो जे उपयुक्त असेल, मजेदार असेल आणि त्यालाही खूप आवडेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिफ्ट बजेटमध्ये असावं. जर तुम्ही तुमच्या सीक्रेट सँटाला काय गिफ्ट द्यावं याबद्दल गोंधळलेले असाल, तर तुमच्या बजेटमधल्या काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया...

कॉफी मग हे नेहमीच उपयुक्त असतात, ऑफिसमध्ये प्रत्येकाचा स्वतंत्र कॉफी मग असतोच. त्यामुळे फोटो किंवा छानसा मेसेज असलेला कॉफी मग चांगला पर्याय आहे.

आपला ऑफिस डेस्क हा स्वच्छ, सुंदर असावा असं प्रत्येकालाच वाटतं. डेस्क प्लांट्समुळे त्यात भर पडते आणि काम करण्यास उत्साह येतो.

बाजारात सुंदर पर्स, पाकिट आणि बॅग उपलब्ध आहेत. ५०० रुपयांच्या आतमध्ये हमखास छान वस्तू मिळू शकतात, ज्याचा लोकांना फायदाच होतो.

चॉकलेट खायला सर्वांनाच खूप आवडतं. नेहमीच्या चॉकलेटपेक्षा थोडं वेगळं, चांगलं आणि मोठं चॉकलेट्स गिफ्ट करू शकता.

स्टील, काच किंवा तांब्याची पाण्याची बॉटल तुम्ही गिफ्ट करू शकता. सध्या टम्बलरची क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा देखील चांगला पर्याय आहे.

नाव असलेला पेन, फोटो फ्रेम किंवा लाकडी पेन स्टँड देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता, ज्याचा फायदाच होतो.

ख्रिसमस-थीम असलेले स्टायलिश मफलर, स्कार्फ अशा हिवाळ्यातील एक्सेसरीज खूप उपयुक्त आहेत.

बाजारात विविध रंगाच्या आकर्षक सुगंधित मेणबत्त्या उपलब्ध आहेत. शांत खोलीत हलका सुगंध आनंदी वातावरण निर्माण करतो. तसेच मनालाही प्रसन्न वाटतं.

3D सोलर सिस्टम क्रिस्टल बॉल हा फार सुंदर असतो. डेस्क किंवा बेडरूमच्या सजावटीसाठी एक उत्तम पर्याय आहे.