1 / 10विकी कौशल सध्या त्याच्या चित्रपटातील भूमिकांसाठी फार चर्चेत आहे. विकी विविध मुलाखतींमध्ये तो खाण्याचा शौकीन असल्याचे सांगताना दिसतो. 2 / 10न्यू होली बाईट्स या चॅनलशी गप्पा मारताना विकीने त्याला आवडणार्या खाद्य पदार्थांची नावे सांगितली. विकीला महाराष्ट्रीय पदार्थ आणि पंजाबी पदार्थ दोन्ही फार आवडतात.3 / 10त्याला उकडीचे मोदक खायला आवडतात. विकीचा जन्म महाराष्ट्रातलाच आहे. त्याचे बालपण असेच पदार्थ खात गेल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे.4 / 10महाराष्ट्रातील लोकांना मिसळ पाव आवडत नाही असे अगदीच क्वचित असेल. मुंबईमध्ये राहिलेल्या विकीलाही मिसळ फार आवडते. 5 / 10विकीला छोले मुळातच फार आवडतात त्यामुळे छोल्यांबरोबर समोस्याचे कॉम्बीनेशन केल्यावर खाण्यात नक्कीच स्वाद येतो. विकीला समोसा पावपेक्षा छोले समोसा आवडतो. 6 / 10मुंबईमध्ये वडापाव हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. विकी डाएट फुडही खातो मात्र त्याला वडापाव फार आवडतो. 7 / 10पावामध्ये वडा जसा छान लागतो तसच भजीही छान लागते. विकीला भजी पावही फार आवडतो.8 / 10पंजाबी पदार्थांमध्ये बटाटा भरपूर वापरला जातो. विकीला आलू टिक्की हा पदार्थ आवडतो. आलू टिक्की हा एक चाटचा पदार्थ असून तो दिल्लीसारख्या ठिकाणी फार खाल्ला जातो.9 / 10चाटचे अनेक पदार्थ आहेत त्यापैकीच एक म्हणजे पापडी चाट. हा चटपटीत आणि आंबटगोड असा पदार्थ विकीचा फेवरेट आहे.10 / 10अनेक मुलाखतींमध्ये विकीने सांगितले आहे की त्याला छोले भटूरे प्रचंड आवडतात. त्याचा सगळ्यात जास्त आवडता पदार्थ हा छोलेच आहे.