बॉलिवूडच्या सुपरहिट बहिणी, कुणी सुपरस्टार तर कुणी बसली घरी! वाचा त्या ८ जणींची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2025 16:21 IST2025-01-29T16:13:53+5:302025-01-29T16:21:51+5:30

Bollywood's 8 sisters duo's read their stories : एक ठरली सुपरहिट आणि दुसरीला घ्यावी लागली माघार. जाणून घ्या बॉलिवूडमधील बहिणींच्या गोष्टी.

बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेली जोडपी आहेत. तसेच बहिणींच्या जोड्याही गाजल्या आहेत. काही प्रेमामुळे तर काही आपसी वादांमुळे.

अशाच आठ बहिणींच्या जोड्यांबद्दल जाणून घेऊ या.

बॉलिवूडमधील सर्वांत जास्त नावाजलेली बहिणींची जोडी म्हणजे करीना व करिश्मा कपूर. या दोघींना त्यांच्यातील प्रेमळ नात्यासाठी ओळखलं जातं. दोघीही गाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांच्या नात्यावर टिका टिपण्ण्या करायची संधी त्या कधीच देत नाहीत. कायम एकत्र आनंदीच दिसतात.

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर जान्हवी कपूर हे नाव फार गाजलं.आता खुशीही गेल्या काही दिवसात नावारुपाला येत आहे. जान्हवी व खुशी एकत्र फार आनंदी दिसतात. श्रीदेवीच्या नंतर जान्हवीच खुशीसाठी आई समान असल्याचे बोलले जाते. दोघी बहिणी इंस्टाग्रामला एकत्र व्हिडिओ फोटो पोस्ट करत असतात.

शिल्पा शेट्टी आणि तिची बहीण दोघींनीही बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं. शिल्पाला फारच यश प्राप्त झालं. पण शमिताला काही तो दर्जा मिळाला नाही. त्या दोघींमध्ये मात्र प्रचंड प्रेम आहे. त्या कायम एकमेकींबद्दल चांगल्या गोष्टी बोलताना दिसतात.

दिशाला तर सगळेच तिच्या सौंदर्यासाठी ओळखतात. पण हल्लीच तिच्या बहिणीची चर्चा जास्त झाली होती. दिशाची बहिण खुशबू एक आर्मी ऑफिसर आहे. ही बातमी मिळाल्यावर लोकांना तिचा फार अभिमान वाटला. त्या दोघी फार एकत्र कधी दिसल्या नाहीत कारण खुशबू पोस्टींगवर असते. दोघीही बहिणी दिसायला फार सुंदर आहेत.

बॉलिवूडमधील सर्वांत जास्त वादात्मक कुटुंब म्हणजे भट. महेश भट कायम वादाचा विषयच बनला आहे. आलिया आणि पूजा सावत्र बहिणी आहेत. त्या एकत्र फार कमी दिसतात. पूजा भट सतत वाईट कारणांसाठी फारच चर्चेत असते. दुसरीकडे आलिया यशस्वी नव्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. दोघींमध्ये २१ वर्षांचं अंतर आहे.

काजोल एक फार लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मात्र तिच्या बहिणीला सतत ट्रोल केलं जातं. ती फार विचित्र पेहराव करते असा लोक दावा करतात. काजोल सारखंच तनिषानेही बॉलिवूडमध्ये काम केले आहे. पण तिला यश काही मिळालं नाही. त्या दोघी बरेचदा एकत्र दिसतात. त्या दोघींचे नाते फार प्रेमळ आहे.

तब्बूच्या आधी तिची मोठी बहीण फराह नाज बॉलिवूडमध्ये गाजली होती. पण तिच्या लग्नानंतर तिने काम बंद केलं. नंतर तब्बूने एकावर एक चांगल्या अभिनयाचे नमुने देत नाव कमवले. या दोघी मात्र कधी एकत्र दिसल्या नाहीत.

अनन्या पांडेला धाकटी बहीण आहे. या दोघींमध्ये फारच आपुलकीचे नाते आहे. अनन्या सांगते की, लहान असली तरी ती जास्त समजुतदार आहे. रायसा दिग्दर्शक होण्यासाठी शिक्षण घेत आहे. अनन्या मनसोक्त तिचे कौतुक करते.