Blouse Net Designs : नेटच्या ब्लाऊजची फॅशन, पाहा १० नवीन सुंदर-स्मार्ट आणि स्टायलिश डिझाइन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:55 IST2025-01-20T08:39:45+5:302025-01-20T17:55:16+5:30

Blouse Net Designs : लग्नसराईच्या दिवसांत प्रत्येकजण छान छान साड्या खरेदी करतो. या साड्यांवर तुम्ही हवंतसं नवीन पॅटर्नचं ब्लाऊज शिवू शकता. सध्या नेटच्या ब्लाऊजची फॅशन ट्रेंडीग आहे.

लग्नसराईच्या (Blouse Net Designs) दिवसांत प्रत्येकजण छान छान साड्या खरेदी करतो. या साड्यांवर तुम्ही हवंतसं नवीन पॅटर्नचं ब्लाऊज शिवू शकता. सध्या नेटच्या ब्लाऊजची फॅशन ट्रेंडीग आहे. (Top 10 Trendy Net Blouse Designs)

तुमची साडी नेटची नसेल तरीही तुम्ही ब्लाऊजच्या मागच्या बाजूला नेट लावून साडीचा आणि ब्लाऊजचाही लूक अधिक आकर्षक करू शकता.

काठपदराच्या साडीवर तुम्हाला असं ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही मोर, कुहीरी, पोपट असे वेगवेगळ्याप्रकारचे खड्यांचे किंवा मण्यांचे पॅचेस लावू शकता.

फॅन्सी शिफॉन,ऑर्गेंजा साडीवर तुम्ही नेटचं ब्लाऊज शिवू शकता.

या पॅटर्नमध्ये तुम्ही आवडीनुसार नेटचे हात शिवू शकता. बाह्यांची लेंथ आवडीनुसार शॉर्ट किंवा लॉन्ग ठेवा.

मागचा गळा व्ही नेक शिवून त्यावर नेट लावून घ्या.

जर लग्नकार्यासाठी ब्लाऊज शिवणार असाल तर हे पॅटर्न ट्राय करू शकता.

ब्लाऊजच्या मागचा गळा त्रिकोणी शिवून तुम्ही हवीतशी हेवी डिजाईन बनवून घेऊ शकता.

नेटचं ब्लाऊज धुताना तुम्हाला काळजीपूर्वक हाताळावं लागेल. अन्यथा जाळी फाटण्याची शक्यता असते.