Gudi Padwa 2026: साडीच्या प्रकारानुसार ‘असा’ शिवा ब्लाऊजचा गळा - साधी साडीही दिसेल लाखांत एक, परफेक्ट लूकची सर्वत्र चर्चा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2026 20:05 IST2026-03-12T20:00:15+5:302026-03-12T20:05:02+5:30
Gudi Padwa 2026 blouse neck designs according to saree type : blouse neck designs for different sarees : how to choose blouse neck design for saree : साडीच्या फॅब्रिकनुसार 'असा' शिवा ब्लाऊजचा गळा! साडी - ब्लाऊजचे परफेक्ट कॉम्बिनेश - लूक भारी दिसाल देखण्या...

blouse neck designs according to saree type
साडीचे सौंदर्य हे केवळ साडीच्या किमतीवर नाही, तर तुम्ही त्या साडीवर कोणत्या प्रकारचे ब्लाऊज मॅच करता, यावर तुमचा संपूर्ण लूक अवलंबून असतो. साडीचा लूक अधिक खुलवण्यासाठी ब्लाऊजची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते. अनेकदा आपण खूप महागडी साडी खरेदी करतो, पण ब्लाऊजचा नेक पॅटर्न निवडताना चुकतो, ज्यामुळे संपूर्ण लूक बिघडू शकतो.

प्रत्येक साडीच्या कापडाचा पोत वेगळा असतो; काही साड्या अंगाला चिकटून बसतात, तर काही फुगीर राहतात. म्हणूनच, कांजीवरम सिल्कपासून ते वजनाला हलक्या असणाऱ्या शिफॉनपर्यंत, कोणत्या साडीवर कोणता नेक पॅटर्न शोभा देईल, हे माहीत असणे गरजेचे आहे( blouse neck designs for different sarees).

साडी कितीही सुंदर असली तरी योग्य ब्लाऊज आणि त्याचा (how to choose blouse neck design for saree) नेकपॅटर्न निवडला नाही तर संपूर्ण लूक तितका उठून दिसत नाही. साडीचे फॅब्रिक, तिचे टेक्श्चर आणि डिझाइन यानुसार ब्लाऊजचा नेकपॅटर्न ठरवला तर तुमचा लूक अधिक स्टायलिश आणि एलिगंट दिसू शकतो. सिल्क, कॉटन, जॉर्जेट किंवा शिफॉन अशा प्रत्येक साडीच्या फॅब्रिकसाठी वेगळे नेकपॅटर्न अधिक सुंदर दिसतात. साडीच्या फॅब्रिक्सनुसार कोणत्या प्रकारचे ब्लाऊज नेकपॅटर्न निवडले तर तुमचा लूक अधिक उठून दिसेल ते पाहूयात.

१. कांजीवरम सिल्क साडी :-
कांजीवरम सिल्क साडी स्वतःच रॉयल आणि भारी दिसते. त्यामुळे त्यावर क्लासिक आणि एलिगंट नेकपॅटर्न छान दिसतात. असा साडी, ब्लाऊजचा संपूर्ण लूक पारंपारिक आणि राजेशाही लूक देतो. पाठीवर मोठी नक्षी किंवा लटकन लावता येतात. कांजीवरम सिल्क साडीवर बोट नेक, हाय नेक, पोटली बटनसोबत डीप बॅक नेक किंवा स्क्वेअर नेक पॅटर्न सुंदर दिसतो.

२. बनारसी साडी :-
बनारसी साडीचा काठ मोठा असल्याने साध्या गोल गळ्याचे आणि कोपरापर्यंत बाह्यांचे ब्लाऊज क्लासी दिसतात. यासोबतच बनारसी साडीवर डीप - व्ही नेक, बोट नेक, स्वीटहार्ट नेक पॅटर्नचे ब्लाऊज अधिक शोभून दिसतात.

३. ऑर्गनझा साडी :-
ऑर्गनझा फॅब्रिक्सच्या साड्या सध्या फारच ट्रेंडमध्ये आहे, यावर थोडे फॅन्सी आणि स्टाईलिश नेकपॅटर्नचे ब्लाऊज उठून दिसतात. ऑर्गनझा साडी स्वीटहार्ट नेक, स्क्वेअर नेक आणि यू नेक पॅटर्नचे ब्लाऊज अधिक परफेक्ट मॅच होतात. ऑर्गनझा साडीवर जास्त भारी डिझाईन असलेले ब्लाऊज टाळले तर साडीची एलिगन्स जास्त उठून दिसते.

४. कॉटन साडी :-
कॉटन साड्या साध्या पण खूप एलिगंट दिसतात. त्यामुळे त्यावर मिनिमल आणि कम्फर्टेबल नेकपॅटर्न योग्य ठरतात. कॉलर नेक, राउंड नेक, स्क्वेअर नेकचे ब्लाऊज उठून दिसतात. कॉर्पोरेट आणि एलिगंट लूक मिळतो. कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिससाठी हे डिझाईन उत्तम आहे.

५. जॉर्जेट साडी :-
जॉर्जेट साडी हलकी आणि फ्लोई असते, त्यामुळे त्यावर थोडे मॉडर्न नेकपॅटर्न सुंदर दिसतात. स्वीटहार्ट नेक, डीप यू नेक, ऑफ-शोल्डर नेकपॅटर्न जॉर्जेट फॅब्रिक्सच्या साडीवर सुंदर दिसतात.

६. शिफॉन साडी :-
हे फॅब्रिक हलके असल्याने डीप गळे किंवा स्ट्रॅपी ब्लाऊज यावर खूप स्टायलिश दिसतात. शिफॉन साडी अतिशय सॉफ्ट आणि ग्रेसफुल दिसते. त्यामुळे तिच्यावर फेमिनिन आणि सॉफ्ट लूक देणारे नेकपॅटर्न उत्तम दिसतात. हॉल्टर नेक, डीप व्ही नेक, कीहोल नेक असलेले ब्लाऊज शोभून दिसतात.

७. लिनन साडी :-
लिनन साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. त्यावर सिंपल पण स्टायलिश नेकपॅटर्न छान दिसतात. बोट नेक, प्रिन्सेस कट नेक, क्लासिक राउंड नेक असे बेस्ट पर्याय आहेत.

८. नेट साडी :-
नेट साड्या पार्टी किंवा फंक्शनसाठी नेसल्या जातात, त्यामुळे त्यावर ग्लॅमरस नेकपॅटर्न अधिक उठून दिसतात. डीप बॅक नेक, शीयर हाय नेक, स्वीटहार्ट नेक असे ब्लाऊजच्या गळ्याचे पॅटर्न छान दिसतात.

















