शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Blouse designs for Makar Sankranti : संक्रांतीला काळ्या साडीवर ट्राय करा ब्लाऊजचे 'हे' वॉव पॅटन्स; पाहा एकापेक्षा आकर्षक डिजाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 6:52 PM

1 / 12
मकरसंक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. संक्रांतीला काळी वस्त्र परिधान केली जात हे तुम्ही ऐकूनच असाल. काठापदराच्या काळ्या साड्या तुम्ही नेहमीच ट्राय केल्या असतील. या लेखात तुम्हाला काळ्या साड्यांवर सूट होतील असे आकर्षक ब्लाऊज पॅटर्न्स दाखवणार आहोत (Black Blouse designs for Makar Sankranti) (Image credit-keepmestylish.com)
2 / 12
सणासुदीला काळा रंग घालणं अशुभ मानलं जातं. मात्र मकर संक्रांत हिवाळ्यामध्ये येते. हिवाळ्यात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून संक्रांतीला काळे कपडे परिधान केले जातात.
3 / 12
जर तुमची साडी काठा पदराची असेल तर तुम्ही थ्री फोर हँण्ड्सच ब्लाऊज किंवा हेवी वर्क ब्लाऊजसुद्धा ट्राय करू शकता.
4 / 12
जर तुमची साडी नेटच्या पॅटर्नची असेल तर मागे मटका गळा शिवून तुम्ही नेटवर वर्क असलेल्या ब्लाऊजचा पर्याय निवडू शकता.
5 / 12
फुग्यांच्या ब्लाऊजची फॅशन अजूनही खूप ट्रेंड होते. अभिनेत्रीसुद्धा फुग्यांच्या ब्लाऊजची स्टाईल करताना दिसून येतात.
6 / 12
काळ्या साडीच्या बॉर्डरवर सुट होईल असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही शिवू शकता. काळ्या साडीवर गोल्डन ब्लाऊज हा सुद्धा मस्त ऑप्शन आहेय. तुम्हाला हव्या लेटेस्ट पॅटर्नमध्ये गोल्डन ब्लाऊज शिवू शकता. (Image Credit- panashindia)
7 / 12
जर तुमची साडी प्लेन असेल तर ब्लाऊज प्रिटेंट किंवा हेवी वर्कचं असेल असं पाहा. सिंपल साडीवर हेवी ब्लाऊज वेअर केल्यास तुमचा लूक अधिकच खुलून दिसेल. (Image credit- myntra)
8 / 12
जर तुम्हाला वन साई़ड पदर घ्यायला आवडत असेल तर असं ब्लाऊज पॅटर्न नक्की ट्राय करून पाहायला हवं.
9 / 12
काळ्या साडीवर चेक्सचं ब्लाऊजसुद्धा उठून दिसेल. तुम्हाला आवडत असल्यास अशा ब्लाऊजला फ्रिलचे बॉर्डर लावू शकता.
10 / 12
प्लेन काळ्या साडीवर ब्लाऊजचा मागचा गळा मोठा शिवून तुम्ही असं सिंपल पॅट्रर्न करू शकता. तुमच्या आवडीनुसार गोंडे लावून आकर्षक लेस लावू शकता.
11 / 12
कॉलरनेक किंवा बोट नेक ब्लाऊजसुद्धा काळ्या साडीवर सुंदर लूक देतील.
12 / 12
(Image Credit- Social Media, myntra)
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सMakar Sankrantiमकर संक्रांतीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणShoppingखरेदी