आंबट झालेलं दही फेकून देण्याआधी थांबा! वापरा ६ प्रकारे - दही वाया न जाता मिळतील अनेक फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2025 11:01 IST2025-09-18T08:56:45+5:302025-09-18T11:01:00+5:30

how to use sour curd : best ways to use sour curd at home : home remedies with sour curd : sour curd household hacks : easy tips to use sour curd : आंबट झालेलं दही शक्यतो आपण फेकून देतो, परंतु फेकून न देता त्याचा नेमका वापर कसा करावा, ते पाहा..

दही हे आपल्या सगळ्यांच्याच घरात असते. दही काहीवेळा चवीला खूपच (easy tips to use sour curd) आंबट होते, असे आंबट दही खाण्यायोग्य राहत नाही. अशावेळी, आंबट दही फेकून देणे हाच एकमेव उपाय वाटतो. पण थांबा! तुम्हाला माहित आहे का, की आंबट झालेले दही फेकून देण्याऐवजी त्याचा अनेक कामांसाठी उपयोग होऊ शकतो.

आंबट दह्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेचे सौंदर्य टिकवण्यापासून घरगुतीकामांपर्यंत (best ways to use sour curd at home) अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरतात. आंबट दह्याचा उपयोग कसा करायचा याबद्दल काही सोप्या आणि (home remedies with sour curd) खास टिप्स पाहूयात.

१. कढी, थालीपीठ, किंवा दही वडा, ढोकळा तयार करण्यासाठी आपण या आंबट झालेल्या दह्याचा वापर करु शकतो. यामुळे या पदार्थांची चव वाढते.

२. आंबट दही केसांसाठी उत्तम नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. त्यात असलेले लॅक्टिक अ‍ॅसिड केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करते आणि केस मऊ व चमकदार बनवते. थोडे आंबट दही केसांना आणि स्काल्पला लावा. २० ते २५ मिनिटे ठेवा आणि नंतर केस शाम्पूने धुवा.

३. आंबट दही त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. हे त्वचा आतून स्वच्छ करते, टॅनिंग कमी करते आणि त्वचेला मुलायम बनवते. आंबट दह्यात थोडे बेसन आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा.

४. तांबे आणि पितळेच्या भांड्यांना स्वच्छ करण्यासाठी आंबट दही फायदेशीर ठरते. आंबट दह्यात थोडे मीठ मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टने भांडी घासा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. भांडी नव्यासारखी चमकतील.

५. आंबट दही पाण्यांत मिसळून कुंडीतील रोपांच्या मातीत घातल्यास रोपांची वाढ चांगली होते.

६. आंबट दही आणि बेसन एकत्रित करून या पेस्टने तेलकट भांडी घासल्यास ती लगेच स्वच्छ होतात व त्यांचा तेलकटपणा कमी होतो.