फक्त ५०० रुपयांत दिसा 'बॉस लेडी'! ५ प्रिंटेड साड्या देतात क्लासिक ऑफिस लूक- पाहा लेटेस्ट कलेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2026 19:00 IST2026-01-30T19:00:00+5:302026-01-30T19:00:03+5:30
stylish office sarees: budget fashion India: printed sarees for office wear: ऑफिसमध्ये नेसण्यासाठी ५ प्रिंटे़ड साड्यांचे लेटेस्ट पॅटर्न

ऑफिसला जाताना आपला लूक केवळ स्टायलिश असून चालत नाही. तर तो प्रोफेशनल देखील असणं तितकंच गरजेच आहे. बऱ्याचदा महिलांना वाटतं रॉयल लूक मिळवण्यासाठी महागड्या साड्यांचीच गरज आहे.५०० रुपयांच्या आसपास मिळणाऱ्या प्रिंटेड साड्या वापरूनही ऑफिसमध्ये बॉस लेडी लूक मिळवू शकता. (stylish office sarees)

ऑफिसमध्ये नेसण्यासाठी ५ प्रिंटे़ड साड्यांचे लेटेस्ट पॅटर्न पाहूया. (printed sarees for office wear)

फ्लोरल प्रिंटेड जॉर्जेट साडी ही वजनाला हलकी असते. त्यामुळे या दिवसभर नेसून ऑफिसमध्ये काम करता येते. यावर फुलांच्या प्रिंट्स असतील तर लूक प्रोफेशनल दिसतो.

चौकोन, त्रिकोण किंवा स्ट्राइप्स असलेल्या साड्या ट्रेंडी आणि कॉन्फिडेंट लूक देतात. ५०० रुपयांच्या बजेटमध्ये या साड्या क्रेप किंवा पॉलिस्टर सिल्क मटेरियलमध्ये सहज मिळतात.

पोलका डॉट्स प्रिंट साड्या या अधिक स्टायलिश दिसतात. काळ्या-पांढऱ्या किंवा निळ्या-पांढऱ्या रंगातील पोलका डॉट्स साड्या प्रोफेशनल मीटिंग्ससाठी चांगल्या असतात.

डिजिटल प्रिंट्समध्ये साड्यांना इस्त्री करण्याची फारशी गरज पडत नाही, त्यामुळे सकाळी घाईच्या वेळी हा एक उत्तम पर्याय आहे. यात अॅबस्ट्रॅक्ट प्रिंट्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत.

एथनिक आणि रॉयल लूक हवा असेल, तर कलमकारी प्रिंट साडी निवडा. कॉटन किंवा सिंथेटिक कॉटनमध्ये मिळतात. पारंपारिक डिझाईन्स आपल्या चांगला लूक देतात.

















