जाड दंडांमुळे साडी नेसली की फार बेढब दिसता? बाह्यांचे ५ डिझाईन्स पाहा, दंड दिसतील सुबक आणि स्लिम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2026 19:00 IST2026-02-15T19:00:00+5:302026-02-15T19:00:02+5:30

slim looking sleeve styles: blouse designs for fat arms: sleeve designs for heavy arms: योग्य स्लीव्हज डिझाइनची निवड करून आपण आपले दंड लपवू शकतो.

प्रत्येक महिलेला साडीमध्ये सुंदर आणि परफेक्ट दिसायला आवडतं. साडी कितीही महागडी असली, तरी तिचा संपूर्ण लुक हा ब्लाऊजच्या फिटिंगवर अवलंबून असतो. अनेकदा ब्लाऊज दंडाजवळ खूप टाइट होतो, ज्यामुळे साध्या किंवा आखूड बाह्यांच्या ब्लाऊजमध्ये हात अधिकच जाडजूड दिसू लागतात. यामुळे अनेकदा आत्मविश्वास कमी होतो किंवा हवी तशी फॅशन करता येत नाही.(slim looking sleeve styles)

पण योग्य स्लीव्हज डिझाइनची निवड करून आपण आपले दंड केवळ लपवू शकत नाही, तर ते सुबक आणि स्लिमदेखील दाखवू शकता. पाहूयात स्लीव्ह्जचे ५ पॅटर्न. (blouse designs for fat arms)

Elbow Length Sleeves हा सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. कोपरापर्यंत लांबी असलेल्या बाह्या दंडाचा सर्वात जाड भाग पूर्णपणे झाकतात. ज्यामुळे आपला लूक अधिकच क्लासी दिसतो.

आपले दंड खूप जाड असतील तर कोपऱ्याच्या खाली ३-४ इंच लांब असणाऱ्या बाह्या शिवून घ्या. या डिझाईनमुळे लोकांचे लक्ष आपल्या दंडावरून विचलित होऊन मनगटाकडे जाते. ज्यामुळे आपले हात स्लिम दिसतात.

बेल स्लीव्हज कोपरापर्यंत घट्ट असतात आणि पुढे खाली त्यांना मोठा घेर असतो. या फ्लेअरमुळे हाताचा वरचा जाड भाग बारीक वाटू लागतो. इंडो-वेस्टर्न ब्लाऊजसाठी हा पॅटर्न अत्यंत स्टायलिश दिसतो.

अनेकांना वाटतं की पफ बाह्यांमुळे हात जास्त जाड दिसतात. पण खूप घट्ट पफ ऐवजी थोडे लूज किंवा खालच्या बाजूला झुकलेले पफ शिवले, तर ते दंडाचा आकार लपवण्यासाठी चांगला पर्याय ठरतात.

ब्लाऊजच्या कापडाऐवजी नेट किंवा पारदर्शक ऑर्गेन्झा कापडाच्या बाह्या शिवल्याने हातांना लाईट लूक मिळतो. जाड आणि जड कापडामुळे हात अधिक भरलेले दिसत, तर नेटच्या बाह्यांमुळे हात थोडे बारीक दिसतात.