तरुण आणि स्टायलिश दिसायचं तर ब्लाऊजच्या ‘या’ ५ नेकलाइन निवडा, चुकीच्या नेकलाइनमुळे तुम्ही दिसता म्हाताऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2026 11:35 IST2026-03-20T20:00:00+5:302026-03-22T11:35:21+5:30

Blouse neckline design: Young look sathi blouse designs: तरुण दिसण्यासाठी ब्लाऊज नेकलाईनचे ५ पॅटर्न

स्त्रीच्या सौंदर्यात साडीची भर पडतेच पण त्या साडीला खरा उठाव मिळतो तो ब्लाऊजच्या फिटिंग आणि डिझाईनमुळे. बऱ्याचदा महिलांना असं वाटतं की वाढत्या वयानुसार लूक बदलतो. पण खरी गंमत तर ब्लाऊजच्या नेकलाईनमध्ये असते. चुकीचा गळा निवडला की मान आखूड दिसते, खांदे झुकलेले दिसतात आणि चेहरा थकलेला किंवा आपण वयस्कर वाटू लागतो.(Blouse neckline design)

जर आपल्याला लग्नसमारंभात किंवा पार्टीत सर्वात 'यंग' आणि 'स्मार्ट' दिसायचं असेल, तर ब्लाऊजचा गळा निवडताना थोडा विचार करणे आवश्यक आहे. योग्य नेकलाईन केवळ आपली पर्सनॅलिटी सुधारत नाही, तर आपल्याला तरुणही दाखवतो. पाहूया ब्लाऊज नेकलाईनचे ५ पॅटर्न. (Young look sathi blouse designs)

स्वीटहार्ट नेकलाइन ही दिसायला हृदयाच्या आकारासारखी असते. यामुळे गळा आणि छातीचा भाग हा संतुलित दिसतो. ज्या महिलांचा चेहरा गोल आहे त्यांनी ही नेकलाईन ट्राय करावी. यामुळे मान लांब दिसते आणि आपण अधिक उंच दिसतो.

सर्वात क्लासिक आणि कधीही फॅशनच्या बाहेर न जाणारा प्रकार म्हणजे व्ही नेक. ही नेकलाईन शरीराला लिफ्ट देते. यामुळे आपली उंची जास्त वाटते आणि आपण स्लिम दिसतो. जाड असणाऱ्या महिलांसाठी हा सगळ्यात चांगला पर्याय आहे.

आपले खांदे रुंद असतील तर ब्रॉड स्क्वेअर चौकोनी गळा खूप सुंदर दिसतो. हा पॅटर्न आपल्या चेहऱ्याकडे लक्ष वेधून घेतो आणि आपल्याला मॉर्डन, स्मार्ट लूक मिळतो.

एलिंगट आणि रॉयल लूकसाठी बोट नेक सर्वोत्तम आहे. हा गळा जास्त खोल नसतो, त्यामुळे तो अतिशय सोबर वाचतो. बारीक किंवा लांब मान असलेल्या स्त्रियांवर हा पॅटर्न अधिक खुलून दिसतो.

आपल्या थोडा बोल़्ड आणि ग्लॅमरस लूक हवा असेल तर डीप यू- नेक निवडा. यामुळे गळ्याचा भाग मोकळा दिसतो. ज्यामुळे आपण फ्रेश आणि तरुण दिसता. हा गळा शिवताना फिटिंगची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.