अभिनेत्रींचं ब्यूटी सिक्रेट! ३ दिवसांत चेहरा करेल ग्लो- सोपा घरगुती उपाय, वाढत्या वयात त्वचा चमकेल मोत्यासारखी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2025 19:05 IST2025-07-14T19:00:00+5:302025-07-14T19:05:01+5:30
Youthful skin remedy : Simple skincare for glowing face: 3-day glow remedy at home: आपल्यालाही त्वचा सुंदर आणि चमकदार दिसावी अशी वाटतं असेल तर काही घरगुती उपाय करुन त्वचा चमकवू शकतो.

वय वाढू लागले की, चेहऱ्यावर डाग, मुरुमे, पिंपल्स आणि सुरकुत्या दिसू लागतात. आपला चेहरा नितळ, चमकदार असावा असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी आपण वेगवेगळे ब्यूटी उत्पादनांचा वापर करतो. (Youthful skin remedy)
अनेकदा आपल्याला आपली त्वचा बॉलिवूडच्या अभिनेत्रींसारखी ग्लो करावी, सुंदर दिसावी असं वाटतं परंतु, कितीही काही केलं तरी त्वचा काही ग्लो होत नाही. जर आपल्यालाही त्वचा सुंदर आणि चमकदार दिसावी अशी वाटतं असेल तर काही घरगुती उपाय करुन त्वचा चमकवू शकतो. (Simple skincare for glowing face)
सकाळी उठल्यानंतर ग्लासभर कोमट पाणी प्या. ज्यामुळे त्वचा हायड्रेट होण्यास मदत होईल.
बाहेरच्या प्रदूषणामुळे त्वचा खराब होते. ज्यामुळे त्वचा कधी तेलकट किंवा कोरडी पडते अशावेळी नियमितपणे सौम्य फेशवॉशने चेहरा धुवा. ज्यामुळे त्वचेवरील घाण आणि तेल निघून जाईल.
बऱ्याच अभिनेत्री या आपलं स्किन केअर रुटीन शेअर करत असतात. यामध्ये त्या बेसन, हळद आणि दूध मिसळून त्याचा फेस पॅक तयार करतात. हा पॅक त्वचेवर १५ ते २० मिनिटे लावा आणि नंतर थंड पाण्याने त्वचा धुवा.
बऱ्याच अभिनेत्री या आपलं स्किन केअर रुटीन शेअर करत असतात. यामध्ये त्या बेसन, हळद आणि दूध मिसळून त्याचा फेस पॅक तयार करतात. हा पॅक त्वचेवर १५ ते २० मिनिटे लावा आणि नंतर थंड पाण्याने त्वचा धुवा.
त्वचा चमकवण्यासाठी आपला आहार देखील योग्य असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी फळे आणि हिरव्या भाज्या खा. तेलकट आणि जंक फूड खाणे टाळा. ज्यामुळे त्वचा आतून निरोगी राहण्यास मदत होईल.
जास्त प्रमाणात ताण घेतल्याने शरीरासह त्वचेवर देखील त्याचा परिणाम होतो. त्यासाठी नियमितपणे ध्यान, योगासने करा. ज्यामुळे आपलं मन शांत राहिल. आणि त्वचा उजळण्यास मदत होईल.
आपल्याला रोज किमान ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्यायला हवी. ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील. पुरेशी झोप घेतल्याने त्वचेच्या समस्या कमी होतात.