हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:01 IST2025-11-06T12:49:51+5:302025-11-06T13:01:12+5:30

तुम्ही जर आपल्या रुटीनमध्ये काही सोप्या सवयींचा समावेश केला तर तुमचेही केस खूप सुंदर होतील. कसं ते जाणून घेऊया...

लांब, जाड आणि काळेभोर केस सर्वांनाच हवे असतात. पण हल्ली हेअर फॉलचा त्रासाने अनेक जण कंटाळले आहेत. पण तुम्ही जर आपल्या रुटीनमध्ये काही सोप्या सवयींचा समावेश केला तर तुमचेही केस खूप सुंदर होतील. कसं ते जाणून घेऊया...

केसांना तेल लावणं देखील तुमच्या आरोग्याचा एक आवश्यक भाग मानला जातो. आठवड्यातून दोनदा हलकं गरम केलेल्या नारळाच्या तेलाने मालिश करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं.

केसांची मुळं यामुळे मजबूत होतात आणि केस गळणं देखील कमी होतं. रात्रभर तेल लावून सकाळी माइल्ड शाम्पूने केस नीट धुणं ही सर्वोत्तम पद्धत मानली जाते.

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी, तुमच्या आहारात प्रोटीन, आयर्न आणि बायोटिन समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट असले पाहिजेत मसूर, हिरव्या भाज्या, चीज आणि आवळा हे केसांसाठी उत्तम मानले जातात.

केस निरोगी राखण्यासाठी दररोज पुरेसं पाणी प्या, कारण हायड्रेशनमुळे टाळू चांगला राहतो आणि केसांची नैसर्गिक चमक टिकून राहते.

स्ट्रेटनर, कलरिंग किंवा ब्लो ड्रायरचा जास्त वापर केसांची चमक आणि रंग कमी करू शकतो. अशा परिस्थितीत, केस नैसर्गिकरित्या सुकू द्या.

आठवड्यातून एकदा नैसर्गिक हेअर मास्क लावा. कोरफड, दही आणि हिबिस्कस पावडरपासून बनवलेला मास्क केसांना मऊ आणि मजबूत बनवतो.

तुम्हाला तुमचे केस वाढवायचे असले तरी, दर ८ ते १० आठवड्यांनी हलके ट्रिम करा. यामुळे स्प्लिट एंड्स दूर होतात आणि केसांची निरोगी वाढ होते.

तुमचे केस वारंवार घट्ट पोनीटेलसारखं बांधणं टाळा. तुमचे केस मोकळे ठेवा किंवा लूज वेणीने बांधल्याने तुमच्या केसांवर ताण येत नाही.

जसं आपण आपल्या त्वचेचं रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावतो, तसेच धूळ आणि प्रदूषणापासून आपले केस वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. घराबाहेर पडताना तुमचे केस स्कार्फ किंवा दुपट्ट्याने झाका.

तुम्ही गुलाबपाणी, कोरफड आणि आर्गन तेलाने बनवलेले हेअर मिस्ट देखील वापरू शकता. हे तुमच्या केसांना हायड्रेट करण्यास आणि त्यांची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करते.