नाजुक दंडावर घाला सुंदर बाजुबंद, हातांचं सौंदर्य खुलून दिसाल घरंदाज- बघा बाजुबंदाचे १० लेटेस्ट डिझाईन्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2025 16:57 IST2025-12-13T16:44:40+5:302025-12-13T16:57:30+5:30

लग्नसराईसाठी बाजुबंदाची खरेदी करणार असाल तर असे काही सुंदर डिझाईन्स आताच पाहून ठेवा..

अशा प्रकारचे कित्येक नवनविन प्रकारचे बाजुबंद सध्या लग्नसराईनिमित्त बाजारात आले आहेत.

तुम्ही सोन्यामध्येही असे बाजुबंद घडवून घेऊ शकता किंवा १ ग्रॅम सोन्यातही असे कित्येक आकर्षक पर्याय मिळतील.

ऑनलाईन शॉपिंग साईटवरून किंवा मग तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमधूनही तुम्ही बाजुबंदाची खरेदी करू शकता.

अगदी २०० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत तुम्हाला बाजुबंदाचे कित्येक सुंदर प्रकार मिळू शकतात.

अशा प्रकारचे अगदी नाजुक बाजुबंदही नाजूक दंडावर शोभून दिसतात.

दंड मोठे असतील तर असे हेवी वर्क असणारे मोठे बाजुबंद घ्या. ते हातावर खूप भारदस्त वाटतात.

ऑक्सिडाईज प्रकारातही सध्या कित्येक बाजुबंद विक्रीला आलेले आहेत.

बाजुबंद आणि गळ्यातलं एकसारखं घालण्याची फॅशन अजूनही ट्रेंडिंग आहे. या प्रकारातलं एखादं डिझाईनही शोभून दिसतं.