ब्लाऊजला फॅन्सी लूक देणारे मागच्या गळ्याचे १० लेटेस्ट डिझाईन्स; साडीत स्टायलिश दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:24 IST2025-12-23T11:28:07+5:302025-12-23T12:24:22+5:30
Back Neck Blouse Designs : डिझाईन निवडताना साडीचा प्रकार आणि तुमच्या सोयीचा विचार नक्की करा.

नवीन साडीवर ब्लाऊज (Back Neck Blouse Designs) शिवताना मागचा गळा हा संपूर्ण लूक ठरवणारा महत्वाचा घटक असतो. तर तुम्हाला काहीतरी हटके आणि अधुनिक लूक हवा असेल तर नवीन स्टाईल ट्राय करू शकता. (Latest Back Neck Blouse Designs)

सध्या गोल गळ्याऐवजी इन्फिनिटी कट आणि रिव्हर्स व्ही डिझाई्स लूक देणारे कट खूपच लोकप्रिय आहेत. याचा पाठीचा खालचा भाग वक्राकार पद्धतीनं जोडला जातो. ज्यामुळे ब्लाऊजला मॉडर्न टच मिळतो. (New Patterns Of Blouse Back Neck)

जर तुम्हाला जास्त उघडा गळा आवडत नसेल तर इल्यूजन बॅक ट्राय करू शकता. यात पाठीचा अर्धा भाग साडीच्या कापडाचा आणि वरचा भाग स्किन रंगाच्या नेटचा असतो. या नेटवर साडीच्या काठांचे छोटे पिसेस लावले जातात.

काठ पदर किंवा सिल्क साडीसाठी ओव्हरलॅप डिझाईन अतिशय रॉयल दिसते. यात पाठीचे दोन भाग एकमेकांवरून क्रॉस होतात. याच्या जोडीला खालच्या बाजूला कापडाचा मोठा बो लावू शकता.

डिझाईन निवडताना साडीचा प्रकार आणि तुमच्या सोयीचा विचार नक्की करा. हे डिझाईन्स आकर्षक दिसण्यासाठी पॅडेड ब्लाऊज शिवणं अधिक उत्तम ठरेल.

पारंपारीक साडी असेल तर मागच्या बाजूला मटका गळा शिवून त्याला सिल्व्हर किंवा गोल्डन घुंगरू लावल्यास लूक खुलून येईल.

जर तुम्हाला बोल्ड लूक हवा असेल तर बॅकलेस पॅटर्नध्ये फक्त दोन-तीन जाड आडव्या पट्ट्या शिवून घेऊ शकता.

सध्या ब्लाऊजच्या पाठीवर हातानं केलेली हॅण्ड एम्ब्रॉयडरी किंवा साडीच्या नावाचे पहिले अक्षर विणून घेण्याचा ट्रेंड आहे.

मागच्या गळ्याला कोल्ड कट देऊन त्यावर साडीच्या रंगाचे लटकन किंवा गोंडे लावल्यानं ब्लाऊजला वजनदार लूक मिळतो.

जर तुम्हाला पाठ पूर्ण झाकलेली हवी असेल तर हाय नेक शिवून त्यावर पाठीमागच्या बाजूला उभ्या बटणांची रांग तयार करा.

















