शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भेंडीसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ- अपचन, किडनीस्टोन आणि त्वचारोगाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2026 16:52 IST

1 / 7
भेंडीची भाजी बहुतांश लहान मुलांची अतिशय आवडीची. भेंडी असली की ते हमखास एखादी पोळी जास्तच खातात. भेंडी आरोग्यासाठी, हाडांना बळकटी देण्यासाठी चांगलीच आहे. पण तिच्यासोबत इतर काही पदार्थ एकत्र करून खाणं मात्र पुर्णपणे टाळायला हवं.
2 / 7
याविषयीचा एक व्हिडिओ डॉ. सलीम जैदी यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून ते सांगतात की भेंडीसोबत जर तुम्ही काही इतर पदार्थ खाल्ले तर त्यामुळे पोटाचे त्रास तर होऊ शकतातच, पण त्यासोबतच किडनीस्टोन, त्वचा विकार असे बरेच त्रासही होऊ शकतात. म्हणूनच भेंडीसोबत किंवा भेंडी खाल्ल्यानंतर लगेचच काही पदार्थ खाणं टाळायला हवं.
3 / 7
त्यापैकी पहिला पदार्थ आहे दूध. दूध आणि भेंडी या दोन्हींमध्ये कॅल्शियम असतं. पण त्यासोबतच भेंडीमध्ये ऑक्झालेटही असतं. जेव्हा दुधातलं कॅल्शियम आणि भेंडीमधलं ऑक्झालेट एकत्र येतं तेव्हा कॅल्शियम ऑक्झालेट तयार होतं. यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. शिवाय हे दोन्ही पदार्थ एकत्र किंवा एका नंतर एक लगेचच असे खाल्ल्यास शरीरातला कफही वाढू शकतो.
4 / 7
भेंडी खाल्ल्यानंतर लगेचच चहा पिणं टाळावं. कारण भेंडीमुळे कफ तर चहामुळे वात दोष वाढतो. हे दोन्ही एकानंतर एक खाल्ले तर वात आणि कफ दोन्हींचं संतुलन बिघडतं. शिवाय भेंडीनंतर लगेच चहा प्यायला तर भेंडीमधून मिळणारं पोषण चहातल्या टॅनिनमुळे शरीरात व्यवस्थित शोषून घेतलं जात नाही.
5 / 7
भेंडीची भाजी जेवणात असेल तर त्यासोबत मुळा खाऊ नये. कारण मुळ्यामध्ये सल्फर जास्त प्रमाणात असतं. भेंडीमुळे त्याचं प्रमाण आणखी वाढतं आणि पोट दुखणे, गॅसेस, पोट फुगणे असे त्रास होतात.
6 / 7
भेंडी आणि कारले एकत्र खाणेही टाळायला हवे. दोन्ही थंड प्रकृतीचे आहेत. दोन्ही एकाचवेळी किंवा एका नंतर एक लगेचच खाल्ल्यास शरीरातला कफ वाढतो.
7 / 7
भेंडीसोबत मांसाहार घेतल्यास त्वचारोगाचाही धोका असतो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नmilkदूधvegetableभाज्या