शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावळे सुंदर रूप मनोहर! आषाढीनिमित्त विठुरायाची मुर्ती घ्यायची? बघा विठोबाची वेगवेगळी मोहक रुपं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 15:14 IST

1 / 7
आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठीच एखादा उत्सव असतो. ज्यांना शक्य असतं ते हौशीने वारीला जातात. ज्यांना शक्य होत नाही ते घरातच विठुरायाच्या मुर्तीची पूजा करून तिला मनोभावे नमस्कार करतात.
2 / 7
आषाढीनिमित्त विठ्ठलाच्या अतिशय सुंदर मुर्ती सर्वत्र दिसतात. तुम्हालाही तुमच्या घरासाठी विठ्ठलाची मुर्ती घ्यायची असेल तर या काही मुर्ती पाहा..
3 / 7
अशा मुर्ती तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेगवेगळ्या आकारात मिळू शकतात.
4 / 7
विठोबा रखुमाईच्यामागे प्रभावळ असणारी ही मुर्तीही अतिशय सुंदर दिसते.. २०० रुपयांपासून या मुर्तीची सुरुवात होते. मुर्तीचा आकार जेवढा मोठा तेवढी तिची किंमत वाढत जाते.
5 / 7
पुर्ण काळी मुर्ती नको असेल तर अशी मुर्तीही तुम्हाला आवडू शकते. या मुर्ती फायबरपासून तयार केलेल्या असतात. त्यामुळे थोड्या सांभाळून हाताळाव्या लागतात.
6 / 7
रोजच्या देवपुजेसाठी विठ्ठलाची मुर्ती घेण्याचा विचार करत असाल तर अशी पितळेची मुर्ती घेणं कधीही चांगलं.
7 / 7
काही जण रुक्मिणीची मुर्ती न घेता अशी नुसतीच विठ्ठलाची मोठी मुर्तीही घेतात.
टॅग्स :ShoppingखरेदीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025