आलिया भट्टचा नवा लूक, लुंगी-कुर्ता ड्रेसचा नवा फॅशन ट्रेंड! घालून पाहा, दिसाल अतिशय सुंदर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2025 18:03 IST2025-10-24T17:52:19+5:302025-10-24T18:03:05+5:30
Alia Bhatt Lungi Kurta Fashion Trend : lungi kurta style by Alia Bhatt : बॉलिवूडची फॅशन आयकॉन आलिया भट्ट नेहमीच तिच्या स्टायलिश आणि हटके लूकसाठी फेमस आणि कायम चर्चेत असते.

बॉलिवूडची फॅशन आयकॉन आलिया भट्ट नेहमीच तिच्या स्टायलिश आणि हटके (Alia Bhatt Lungi Kurta Fashion Trend) लूकसाठी फेमस आणि कायम चर्चेत असते. पारंपरिक आऊटफिटला मॉडर्न टच कसा द्यायचा, हे तिला चांगलंच जमतं. सध्या तिच्या एका खास फॅशन ट्रेंडची जोरदार चर्चा आहे - तो म्हणजे 'लुंगी-कुर्ता' लूक!

आलियाने अनेकदा साध्या, प्लेन किंवा हलक्या प्रिंटेड लुंगी स्टाईल स्कर्ट (lungi kurta style by Alia Bhatt) किंवा रॅप-अराऊंड पँट्स घालून हटके फॅशन केली आहे. ही लुंगी पारंपरिक दक्षिण भारतीय लुंगीपासून प्रेरणा घेऊन डिझाइन केलेली असते, पण तिचा कट आणि स्टाईल अतिशय सुंदर दिसते.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Diwali 2025 look) तिच्या खास फॅशन आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. ती जे काही नवीन ट्राय करते, ते फॅशनच्या दुनियेत एक नवा ट्रेंड बनून जातो. या दिवाळीलाही असंच काहीसं पाहायला मिळालं. आलियाने यंदा पारंपारिक नेहमीची तीच ती फॅशन सोडून काहीतरी वेगळं ट्राय केलं.

तिने जरा स्टायलिश आणि मॉडर्न फॅशनमध्ये पेस्टल पिंक रंगाचा कुर्ता आणि पिस्ता हिरव्या रंगाची लुंगी स्टाईल सॉरांग (Sarong) घालून मॉडर्न आणि हटके लूक कॅरी केलेला दिसत आहे. हा पोषाख डिझायनर अबू जानी-संदीप खोसला यांनी डिझाईन केला आहे.

आलियाने दिवाळीच्या खास प्रसंगी जो पोषाख परिधान केला होता, त्यात चिकनकारी कुर्ता होता, जो ऑर्गेंझा फॅब्रिकपासून तयार केला होता आणि त्यावर पारंपारिक पद्धतीचे भरतकाम केलेले होते. हे भरतकाम, खरंतर, पारदर्शक कपड्यावर सूक्ष्म धाग्यांनी केले जाते जे खूपच पारंपरिक आणि आकर्षक दिसते. कुर्त्यावर फूल आणि जिओमॅट्रिक डिझाईन्स मध्ये स्वरोवस्की क्रिस्टल्सचे नक्षीकाम केलेल होते आणि तो अनारकली पॅटर्नमध्ये शिवला होता.

आलियाने मिनिमल लूक ठेवला होता आणि फक्त गळ्यात मोत्यांचा चोकर घातला होता. तिची ही स्टाईल तिच्या संपूर्ण आऊटफिटला आणखीनच गॉर्जियस लूक देत होती. फॅशन आणि साधेपणाचं हे मिश्रण तिला खूपच आकर्षक आणि सुंदर व शोभून दिसत होत.

आलियाचा मेकअप देखील अगदी साधा आणि नॅचरल होता. चेहऱ्यावर गुलाबी ब्लश, डोळ्यांमध्ये काजळ आणि ओठांवर ग्लॉसी गुलाबी लिपस्टिक यामुळे तिचा लूक खूपच नॅचरल दिसत होता. तिने आपले केस मध्यभागी भांग पाडून लो पोनीटेल मध्ये बांधले होते आणि सोबतच ताज्या चमेलीच्या फुलांचा गजरा केसांत माळला होता. या लूकमध्ये पारंपरिकता आणि साधेपणाचा उत्तम समतोल साधलेला दिसून येतो.

















