नवरी नटली! पाठकबाईंनी लग्नात घातलेले पारंपरिक मराठमोळे दागिने; देखणे असे की पाहत राहावे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 17:00 IST2022-12-02T13:23:01+5:302022-12-02T17:00:05+5:30

Akshaya Devdhar Wedding Look : पाठकबाईंचं खास ज्वेलरी कलेक्शन; पाहा मराठमोळ्या वेडींग लूकचे फोटो

राणादा आणि पाठक बाई म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर (Akshaya Devdhar and Hardik Joshi wedding) आज २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. चाहत्यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.

हार्दिक आणि अक्षयाच्या वेडींग लूकनं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे. पारंपारीक मराठमोळ्या दागिन्यांमध्ये दोघांचाही लूक खुलला होता.

लाल रंगाच्या साडीला साजेसं चंद्रकोर प्रिंट केलेलं ब्लाऊज अक्षयानं लग्नप्रसंगासाठी निवडलं.

थ्री फोर स्लिव्हवर आणि मागच्या बाजूलाही चंद्रकोर अधिक उठून दिसत होती.

अक्षयानं वज्रटीक ज्वेलरी गळ्यात घातली होती आणि त्याला साजेसा पारंपारीक हार घातला होता.

हार्दीक अक्षयाला मंगळसुत्र घालतानाचा सुंदर क्षण कॅमेरात टिपण्यात आला. दोन वाट्याचं मोठं मंगळसुत्र हार्दीकनं अक्षयाला घातलं.

तिच्या गळ्यातल्य काळ्या मळ्यांच्या नेकलेसनं ही लक्ष वेधून घेतलं. कपाळावर चंद्रकोर आणि सिंपल मेकअप यावेळी तिनं कॅरी केला होता.

हार्दिकनं रुदाक्षांच्या माळांचा नेकलेस गोल्डन कुर्त्यावर परिधान केला होता.